श्री
श्री
जाणीव वाढवणे आणि हुशार असणे किंव्हा बुद्धी प्रधान असणे किंव्हा भावना प्रधान असणे किंव्हा दृश्यात वावरणे - ह्यात काहीही संबंध नाही. म्हणजे जाणीव वाढवायला "हेतूची" गरज नाही किंव्हा "का" विचारण्याचीही गरज नाही.
म्हणजे जाणीव शुद्ध होण्याचा अभ्यासाला काहीही दृश्याचे निमित्त लागत नसते. ती स्वतः सिद्ध गरज वाटायला हवी.
सिद्ध होणे, ही काही जबाबदारी नाही किंव्हा अट्टाहास नाही, तुलना नाही, स्थळाशी आणि काळाच्या गुणांशी निगडित असू नये. सिद्ध होण्यापेक्षा अस्तित्व भाव जाणून घेणे अधिक हिताचे आहे. "मी कोण आहे" हा प्रश्न स्वतः सिद्ध हवा, दृश्याशी निगडीत "नाही". म्हणजे सुरुवात, शेवट, बदल, घटक, साखळी...अशी काहीही भाषा वापरण्याची गरज नाही.
म्हणून systems ची दखल घ्यावी का, हा ज्याचा त्याचा प्रश्न असावा. Systems हवेत, असे काहीही नाही. Systems मधून विचार सुरू होत नसते, स्थित होत नसते, वावरत नसते. विचार सिद्ध होण्यासाठी प्रकट होत नसतात. विचार फक्त स्थित असतात. कुठलेही रूप किंव्हा आकार *कार्य* दर्शवते, त्याला स्वतःचा हेतू "नसतो". तो भ्रम आहे आपला. म्हणून शांतीचा प्रवास करावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home