Thursday, January 29, 2026

श्री

श्री 

 

स्वतः बद्दल आपण किती अस्थिर आहोत, ही जाणीव होणे आणि स्वीकारणे आले. ते कोडी सोडवण्यासाठी नाही किंव्हा स्पष्टीकरणासाठीही नाही, किंव्हा सिद्ध होण्यासाठीही नाही. म्हणजे अस्थिर समजून घेण्याला "हेतू" असू नये किंव्हा त्यातून काहीतरी "दुरुस्ती" होऊ शकेल ह्या अर्थानेही आपण त्याकडे बघू नये. अस्थिर असणे काही दोष नाही. हा गुण साक्षात अस्तित्व शक्तीतून आलेला असतो आणि तिच्या कार्यातून हा गुण एखादा रूप आणि आकार घेतो - म्हणजे _आपण_ होणे. त्यामुळे सारे काही बरोबरीने अनुभवात गोष्टी उमटायला लागतात आणि "मी" अशी _संकल्पना_ उदयास येते आणि तसे _स्मरण_ संपादन करते. 

 

ह्या वरील सर्व कार्य ह्यास भगवत इच्छा मानावी, म्हणजे त्रास होणार नाही. ह्याला प्रारब्ध म्हणून शकतो - की असे होणार. आपल्याला वाटतं की आपण विचार केला एखाद्या वेळेला, पण सत्य असेही असू शकते की प्रारब्धामुळे या प्रकाराचे विचार ध्यानात प्रकट झाले आणि तसे क्रिया करायला भाग पाडले गेले. म्हणजे माझ्या ध्यानाच्याही पलीकडे आणखीन सूक्ष्म कार्य अस्तित्वाचे चालू असते, जिच्यामुळे मला विचार करणे भाग पडते किंव्हा त्या कार्याचा _न कळत_ समावेश केला जातो. म्हणजे "मी" ही _संकल्पना_ झाली, जी अस्तित्वात _प्रकट_ होते, एक स्वभाव घेते, काही गुण घेते, दृश्यात वावरते आणि निघून जाते. 

 

हा प्रवास असतो स्वतःच्या अनुभवांचा. प्रवाह ह्यासाठी की अनुभव येत राहतात आणि निघून जातात. प्रवास ह्यासाठी की अनुभवांचे स्वरूप सूक्ष्म होऊ शकते. प्रारब्ध आहे, त्यासाठी स्वतःला क्षमा करावी आणि त्या कार्याचे पूर्ण स्वीकार करावा. गोष्टींचे स्वभाव होणे, वावरणे (किंव्हा संबंधात येणे) आणि निघून जाणे, हे भगवत इच्छेने स्थित होते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

स्थिर हे गूढ प्रकरण आहे. म्हणजे त्यावरून गूढ आणि सूक्ष्म स्मरण जाणवते, प्रतिक्रिया देण्याची इच्छा नमवते, आपुलकी सर्व गोष्टींची येते, स्वीकारण्याची शक्ती येते, विषय विलीन होतात, सैय्यम वाढतो, तक्रार नाहीशी होते, श्रद्धा वाढते वगैरे. 

 

हा गुण आत्मसात (realize) करायला लागतो. इथे हेतू ठेवून बुद्धीने विषयाच्या मागे धावणे किंव्हा एखादे सत्य आत्मसात होणे, ह्यात फरक आहे. सत्य आत्मसात होण्याची क्रिया रेषेसारखी सरळ असेल असे नाही, सोप्पी असेल असेही नाही, त्याला स्थळ आणि काळ योग्य कधी ठरू शकेल हे ही सांगणे अवघड...म्हणजे थोडक्यात सर्व भाषा जी हेतूवरून ठरली जाते, ती पूर्ण बाजूला सारायला लागते, किंबहुना तिला शांत होऊ द्यायला लागते. 

 

म्हणून सत्य आत्मसात होण्याची क्रिया आहे अनुभवातून.

 

हरि ओम.

 


0 Comments:

Post a Comment

<< Home