Saturday, February 21, 2026

श्री

श्री 

आयुष्य हे गूढ समजायला लागते...म्हणजे त्यात भगवंताच्या अस्तित्वाचे स्थान असते ज्यामुळे _अनुभव_ ध्यानी येत राहतात. अनुभवाचे उगम, वावर, प्रवाह, प्रवास, संबंध, रूप, भाव ह्याला आपण अस्तित्व मानू शकतो. अनुभवाचा परिणाम म्हणजे स्मरण होणे आणि त्यातून होणाऱ्या क्रिया किंवा व्यवहार. ह्या सर्व "हालचाली" किंव्हा स्थान किंव्हा होण्याचे कारण भगवंताची शक्ती असते. हे सतत ध्यानी ठेवायला लागते. आपण तेवढेच काम करावे, की त्याची आठवण, दृश्यात वावरताना, प्रज्वलित ठेवावी. 

आठवण ठेवण्यासाठी मार्ग अनेक असतात, ज्याला योग म्हणतात. ती आठवण प्रज्वलित ठेवली की कालांतराने शांती भाव संक्रांत होते.   आपण दृश्यात आल्या नंतर परत भगवंतामध्ये विलीन होणे, हा प्रवास आहे. विलीन होणे हे नक्की आहे, कारण ती जाणीव विधिलिखित आहे, म्हणजे त्याचीच इच्छा आहे. हा प्रवास होण्यासाठी *श्रद्धेचे* खूप महत्व आहे. खूप म्हणजे खूप. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home