श्री
श्री
सूक्ष्म माध्यमाच्या अस्तित्वाचे परिणाम असतात. ते कार्य करते. त्या कार्यातून निर्मिती होते स्तरांची, चक्रांची, साखळीची, संबंधांची, वासनेची, विचारांची, भावनांची, रुपाची, देहाची, स्मरणेची...त्यावरून _जग_ _अनुभवास_ येते आणि तसे व्यवहार प्रस्थापित केले जातात जीवाकडून. Phenomenal world.
विचारांची मर्यादा जाणून घेऊन, सत्य आत्मसात व्हायला प्रयत्न, श्रद्धा ह्यांची जोड लागते. विचारांचे स्वरूप विश्लेषण घेते आणि त्यातून विश्वाची रचना विश्लेषणात्मक कळते. Symbolic. Therefore symbolism is a _transformative_ behaviour of the intellect. बुद्धीचा _स्वभाव_ बदलणे अपेक्षित आहे इथे. म्हणजे पूर्वीच्या सवई ज्या बुद्धीशी निगडित असतात (रेष, भाव, संबंधांचे स्वरूप, जर आणि तर, मागे आणि पुढे, आधी आणि नंतर, हे का ते), ह्यात परिवर्तन होते, ते स्वभाव सूक्ष्म होत असताना शांत होतो. शांत होऊ पाहणे म्हणजे परिवर्तित होणे (आणि परिवर्तनाची क्रिया बुद्धीच्या स्वभावाशी निगडित नसते).
इथे हे ही ओळखायला हवे, की _स्वभाव_ संकल्पना धारण झाले असते (inherited/ it is _given_), आणि म्हणून त्याची सुरुवात किंव्हा शेवट समजणे अवघड. इथे कसा भाव असायला ह्या संकल्पनाकडे हे ओळखावे. स्वभावाला विषय म्हणून बघू नये किंव्हा कोड म्हणून. त्याला _स्वीकार_ म्हणून बघायला लागते आणि दोष न देता किंवा न मानता ते शांतीकडे नेण्याचे साधन मानायला हवे. त्यासाठी _शरण जाणे_, ही भूमिका पदार्पण करायला लागते.
आपल्या पद्धतीतून विचार असा दिसतो की वेग वेगळे अनंत रूप आणि आकार ध्यानात येतात. (परत, आपण आणि विचार सारखे नाही. तसे मानल्यामुळे, विचार जे दाखवतील, त्यावरून परिणाम आपण भोगतो...चक्र). विचार शक्ती कामाला लावली, की त्यावरून आणखीन विभिन्न, विघटित गोष्टी _निर्माण_ होत राहतात, जसे की स्वतः रंग भरत जाणे किंव्हा चित्र काढत जाणे आणि त्याचा परिणाम भावनेशी, देहाशी, परिस्थितीशी संबंधित राहतो (त्या गोष्टीही निर्माण करतो).
त्या अर्थाने विचार, भावना, देह, परिस्थिती एकच गोष्ट नमूद करतात. म्हणून परिस्थितीचा विपरीत परिणाम करून घ्यायचा नसेल, तर विचारांचे परिवर्तन होणे गरजेचे ठरते. विचारांवरून काय निर्माण होईल, हे सांगणे अवघड आणि त्यामुळे सतत तात्पुरते, वेगळे, अर्धवट असे भावना देखील निर्माण होत राहतील. म्हणजे विचारांच्या स्वभावातून व्याकुळता असणार आणि समाधान मिळणे कठीण.
हे एकदा ध्यानात आले, की सूक्ष्म माध्यमात समाधान (शांतीचा अनुभव) आहे, असे आपले मन खुणावते आणि मग मार्ग पत्करला जाऊ शकतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home