श्री
श्री
न्यूनगंड निर्माण होतो, कारण आपली जाणीव आपल्याला सांगत असते की आपण अपुरे आहोत, तात्पुरते आहोत वगैरे. हा भाव गूढ आहे आणि एकात कुठेतरी बदल केला तरी सर्वांगीण शांती मिळेल का, हे ओळखावे. त्याच्या उलट अट्टाहासाला पेटून अडथळे दुरुस्त करायला गेलो, तरही नुकसान होण्याची शक्यता असते.
तात्पर्य, खूप आतून संबंधांचे स्वरूप शांतीकडे परिवर्तित व्हायला लागते. त्याला प्रयास आहेत, प्रयत्न आहेत, सैय्यम आहे, श्रद्धेची जरुरी आहे.
काळजी, कष्ट, त्रास, न्यूनपणा कुठून येतो, हे सापडणे मुश्किल असते. मानवी जीव तसा संबंध निर्माण करतो, म्हणून त्या संबंधातून हे भावना निर्माण केल्या गेल्या असतात.
म्हणून हे ओळखावे लागते, की नेमकं आत काय होत आहे ते? आपण कुणालाही बांधील नाही. स्पष्टीकरण देण्याचीही गरज नाही. बहिर्मुख राहण्याची किंव्हा असण्याची गरज नाही.
आपण भगवंताच्या कार्यातून होतो. तो भाव आत्मसात होऊ द्यावे.
हरि ओम.
श्री
मनात खूप काही भावना दाटून येऊ शकतात, कुठल्याही काळातील, कुठल्याही स्थळाचे, कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही रूपाने. तसे झाले, तरी शांत रहावे आणि स्वतःला वरील क्रियेच्या पार्श्वभूमीवर लेखू नये. ज्या वेळेला जे भावना निर्माण होणार असतील, ते त्याच येतील प्रवाह सारखे. त्यांना अडवण्याची गरज नाही किंव्हा विषय म्हणून गाठ सोडवण्याची गरज नाही. प्रवाहातून आपण ठरत नाही आणि त्यावरून क्रियेचा हेतू ठरवण्याची गरज नाही.
आपण स्थिर रहावे, श्रद्धा वाढवावी, कर्तव्य करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःवर आपुलकी प्रकट करत राहावी. परिवर्तन व्हायला वेळ लागतो. सैय्यम ठेवावा. वेळ लागतो, म्हणून व्याकुळ होऊ नये. सत्याचे दर्शन होईलच.
संबंधांचे गुढत्व अजब असते. ते एका पद्धतीने विचार निर्माण करते. त्या निर्मितीमुळे अहं वृत्ती उदयास येते. त्यातून परिणाम भोगला जातो. काहीही असू द्यावे. आपण भगवंत सारखे शांत व्हावे.
हरि ओम.
श्री
स्मरण, ही संकल्पना, खूप गूढ आहे. परिस्थितीतून, नात्यातून, स्थळातून, काळातून, प्रवाहातून, प्रवासातून, संबंधातून आपण दोषी असतो का?!! अनुभव वाट्याला येतात, जी भगवंताची इच्छा असते. अनुभव आपल्याला स्वीकारावे लागतात. ते असे का, आणि तसे का, हे विचारणे फुकट कष्ट देते. त्याचा अर्थ हा, की आपल्याला फक्त कर्तव्य करण्याचे हाथी घेणे आहे आणि ते केल्याने जे काही फळ प्रकट होते, ते स्वीकारावे लागते.
म्हणजे कर्तव्य करणे ह्यात गूढ भाव आहे. फळ निर्माण होणे, हे देखील गूढ कार्य आहे, ते स्वीकारणे हे देखील गूढ असते. म्हणजे प्रत्येक टप्प्यातील भाव गूढ असतो.
हे शांतीचे लक्षण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home