श्री
श्री
सर्व हालचालींचा किंव्हा अस्तित्वाच्या कार्याचा *अवाका* ध्यानी यायला हवा. Scope.
तो अवाका येऊ घातला किंव्हा जाणिवेत आला, की मन स्थिरावते, कारण तो पर्यंत ते सूक्ष्म आणि विशाल आणि अमर्याद झालेले असते.
ह्याचा सोप्पा अर्थ हा की मन, ज्या स्वभावाचे बनले जाते, वासने पासून ते देह पर्यंत, त्यामुळे त्याचे स्मरण, भाव, क्रिया, व्यवहार, संबंध दृश्याशी ठरतो. _मनाचे अस्तित्व आणि त्यामुळे जाणवणाऱ्या हालचाली कोण निर्माण करते?_ उत्तर आहे - भगवंत माध्यम.
ह्या भगवंत माध्यमाचे कार्य ध्यानी येणे अवघड, जिथे अहं भाव असेल. मनाला पूर्णपणे अर्पण करावे लागते आणि शांत होऊ द्यावे लागते, तरच भगवंताचा भाव आत्मसात होऊ शकतो. हा अभ्यास आहे, जो हाथी घ्यायला लागतो.
परिस्थिती, होण्याची क्रिया, हालचाली, संबंध, परिणाम - हे अत्यंत गूढ प्रकरण आहे, जिला मनाच्या दृष्टीने बघितले तर सरळ सुरुवात किंव्हा शेवट नाही. *परिस्थिती आत्मसात* होणे महत्वाचे आहे, तिच्यावर ताबा मिळवणे नाही. सर्व कार्य भगवंताचे असल्यामुळे दृश्यात होणाऱ्या घडामोडी त्याच्या इच्छेने असतात, हे ओघाने आले. म्हणजे हालचालींचे स्वरूप गूढ असते, म्हणून ते शांतीने सामोरे जाऊन स्वीकारावे लागते.
आपल्याला सध्या संकल्पना, अनुभव, परिणाम, चक्र एका मर्यादित पद्धतीने जाणवत राहतात आणि त्यालाच सर्व मूल्य देण्याची घाई करत राहतो. त्यामुळे कष्टी होतो. असे असून सुद्धा, भगवंताचे चिंतन सतत सुरू ठेवले तर वरील मनोरचनेत योग्य परिवर्तन होते आणि सत्य ध्यानी यायला लागते.
राग कशासाठी आणि कुणावर आणि का? तसेच विचार किंव्हा भावनांचा योग्य वापर कसा असावा, हे जाणून घेणे. परिस्थिती आपल्यावर कशीही येईल...त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त शांतीने द्यावे आणि चिंतन करावे भगवंताचे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home