श्री
श्री
दररोजचे संबंध/ परिणाम/ स्मरण, मनाच्या क्रियेमुळे प्रस्थापित होत राहतात. त्या होण्यावर प्रश्न येऊ शकतात, कष्टी व्हायला होते, त्रास होऊ शकतो, दुःख होऊ शकते. त्यातून कृती करण्याचा अट्टाहास निर्माण होऊ शकतो. हे कदाचित होणार. हे कदाचित विधिलिखित असावे. हे सर्व शांतीने स्वीकारावे, असेही हिताचे असते आपल्याला.
प्रश्नांचे उत्तरे जीवाला संपूर्णपणे माहित नसतात, पण तरीही स्वस्थता टिकू शकते मनाला. त्यासाठी मार्ग पत्करायला लागतो. त्यातील एक मार्ग आहे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
प्रश्न _विश्लेषण_ ह्यावरही येऊ शकतात. ते खूप अवघड असावेत दिशा दाखवायला. पण तसे प्रश्न बऱ्याच काळ आपल्या बरोबर असतात, म्हणून काही व्याकुळ वाटून घेण्याची गरज नसते. गोष्टी येणार आणि जाणार. हा प्रवाह ध्यानात शांतीने स्वीकारावा लागतो आणि तसा प्रवास होऊन द्यावा लागतो.
आपले काहीही म्हणणे असू नये की हे असेच का असते आणि ते तसेच का असते. सर्व "तो" जाणतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home