Thursday, August 27, 2026

श्री

श्री 

स्वतःचा प्रवास कसा असतो शांतीकडे, आपुलकीकडे, सत्याकडे - हे गूढ आहे. तो अभ्यासातून होईल, बोलण्यातून होईल, संबंधातून होईल, कामातून होईल, स्मरणेतून होईल....कशातूनही _होत राहील._ 

आणि तसे ओळखले गेले, तर कसली घाई आणि का विघटित रहावे?! असा का विचार करावा की किती विघटित गोष्टींची बेरीज करून पूर्णतः मिळू शकेल?! तसे नसते जीवन. 

बेरीज किंव्हा वजा बाकी हा मुद्दा येऊ नये. आपण जसे आहोत, तिथून सुरुवात होत पूर्णतः प्राप्त होते, कारण तो आत्म्याचा नैसर्गिक गुण असतो. म्हणजे आपण व्याकुळ होण्याची गरज नाही, अपुरेपण ह्यात गुंतून राहण्याची गरज नाही, विषय मांडण्याची गरज नाही, चिकित्सा करण्याची गरज नाही, घाई करण्याची गरज नाही. 

विघटित असणे, हे *निमित्त* असते पूर्ण होण्याचे. म्हणजे सर्व विघटित गोष्टी हितासाठी येत राहतात, त्यात दैवी इच्छा कार्य करत असते आणि सर्व विलीन होऊन सत्य आत्मसात होते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home