श्री
श्री
अस्तित्व भाव आपल्याला मनोरचने प्रमाणे जाणवतो. आपल्यासाठी गती, रूप, आकार, संबंध, हेतू, चक्र, परिणाम अशा काहीश्या गोष्टी जाणिवेत येत राहतात - ज्याला सगुण दर्शन - अशी उपमा दिली गेली आहे.
ह्या वेगळ्या पद्धतीने अस्तित्व भाव जाणिवेत आल्यामुळे, _स्थिरतेकडे_ प्रवास पचनी व्हायला लागतो. स्थिर होणे, हा _प्रवास_ होतो, तो गूढ असावा, त्याला श्रद्धेची जरुरी असावी, त्याला धीमेपणा लागु शकतो, त्याला सर्व हालचालींना सामोरे जाणे येत असावे, त्याला शरण जाणे येत असावे, त्याला सर्व काही देणे येत असावे, _वगैरे_.
आपल्याला स्वतःच्या रुपावर खूप _अभिमान_ असतो. खूप हुशारी, पैसा, विद्वत्ता, भावना प्रधान, वगैरे. ह्यांचे योग्य स्थान ओळखून वावर करावे आणि त्या रूपातून भगवंताचे चिंतन करत राहावे. तात्पुरतेपण, हे येणार ध्यानात. कार्य होत राहणार अस्तित्वात. परिणाम येत राहणार.
काल, आज, उद्या अशी मर्यादित साखळी आपण करतो आणि त्याच्या वेळखात अडकत राहतो. क्षण भगवंताचे आहेत, त्याची इच्छा आहे. म्हणून काळाचे स्पंदने सर्व ठिकाणी, सर्व वेळास, सर्व स्थळात पसरत राहते किंव्हा उपस्थित असते. त्या अर्थाने जाणीव शुद्ध होणे ही गूढ प्रक्रिया समजून घ्यावी.
आहे ते असे आहे. हे कोड नाही की विषय नाही जे समजून घ्यायला लागते की सोडवायचे असते. ते आत्मसात होणे अभिप्रेत आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home