Thursday, July 30, 2026

श्री

श्री 

प्रत्येकाचा प्रवास असतो _भीती_ ओळखण्याचा संपूर्णपणे आणि शांती आत्मसात होऊ देण्याचा. 

हा प्रवास गूढ असतो आणि तो कसा, कुठे, कधी, काय दर्शन देईल, हे भगवंत ठरवतो. माझ्या हातात काहीही नसते आणि आपल्याला फक्त भीती स्वीकार करावी लागते, शांत राहता. 

काहीही विषय म्हणून बघू नये आणि बुद्धीने उगाचच गुंता सोडवण्याचा आटापिटा करू नये.  सुटण्याचे रसायन गूढ असते, फक्त बौद्धिक नाही. म्हणून भगवंताच्या शक्तीचे सतत स्मरण ठेवायला लागते. 

दृश्य हा गुंता नाही की दोष नाही की न्यूनपणा नाही की व्याकुळता नाही की कष्ट नाही. तो बस असतो अस्तित्वाचा एक भाग. त्यालाही संपूर्णपणे आत्मसात होऊ द्यावे लागते. प्रत्येक गोष्ट बदलणारी असते, तात्पुरती राहते, परावलंबी असते. काहीही हरकत असू नये, कारण कार्य भगवंताचे असते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home