श्री
श्री
आपण काहीही म्हणा, संबंध अनेक प्रकाराचे निर्माण होतात, प्रभाव घालतात, बदलत राहतात, वगैरे. संबंध खूप सूक्ष्म स्तरापासून ते स्थूल स्तराचे असतात आणि त्यातून अनेक वेग वेगळे रूप आणि आकार ध्यानात येत राहतात - प्रवाह. त्या प्रवाहाचा परिणाम, चक्र, गूढ भाव, स्मरण होत असते आणि त्या होण्याला आपण *जबाबदार नाही*.
"मी" हा भाव निमित्त म्हणून होतो आणि प्रवासात असतो, प्रवाह जाणवतो आणि तात्पुरता असतो. त्याने व्याकुळ होण्याची गरज नसते आणि सतत भगवंताच्या चिंतनात राहायला लागते.
भगवंताचे नाम, शुद्ध कार्य, हे गूढ परिणाम प्रस्थापित करतात, म्हणून ते सतत स्वतःच्या संपर्कात असायला हवे.
संपर्क, परिणाम, खूप स्तरात पसरला असतो आणि सर्व काही शब्दात मांडता येत नाही आणि सांगण्याचीही _गरज_ नसते आणि त्यातून आपण काहीही ठरत नसतो.
एखाद्या संतांच्या "सहवासात" सर्व मन शुद्ध होते, विचारांच्याही पलीकडे. त्याला वेगळे असे काही वैचारिक प्रयत्न मुद्दामून करण्याची सतत जरूरी असते, असे नाही. तसेच नामाच्या सहवासात योग्य परिवर्तन होते.
श्रद्धा कशी आणि कधी प्रस्थापित होत राहील, हे सांगणे अवघड आणि त्यावरही श्रद्धाच असायला लागते! म्हणून श्रद्धेने दृश्यात वावर करावे मनाने. सर्व योग्य होते.
हरि ओम.
श्री
आजकाल असे ही वाटू लागले आहे, की हालचालींचे रूप आणि स्थान, ह्या _विशेष_ गोष्टी नसतात कधीही....त्यांना आपण मोल देऊन चालना देत राहतो. हा एक प्रकाराचा गुंता असतो, जो बुद्धीने सुटणे कठीण.
म्हणून भगवंताचे सतत चिंतन करावे लागते, म्हणजे मनाला सूक्ष्मता येते, स्मरण तसे होते आणि शांत व्हायला होते. आयुष्याची आसक्ती कुठून येते, ह्यात व्याकुळ होऊन हिताचे नाही. सर्व द्यावे लागते आणि रिकामे व्हायला लागते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home