Saturday, September 13, 2025

श्री

 श्री 


अध्यात्माचा अनुभव, "मी" ह्या संकल्पनेतून जाणवू शकतो. म्हणजे हा अनुभव बाहेरील परिस्थितीशी अवलंबून न ठेवता, तो अंतर्मुख - साखळी, घटक, स्तर, भाव, आत ते बाहेर असे होऊ पाहणारे संबंध ह्यांच्याशी जडलेला आहे. ह्यालाच कदाचित "आत डोकावणे" असे सुचविले आहे. 

"मी" होणे, वावरणे आणि निघून जाणे (परिवर्तन पावणे, बदलत राहणे, स्तरात जाणे) हे *अस्तित्वाचे कार्य ओळखायला हवे.* म्हणजेच असे जाणवायला हवे की असे अनुभव _होत राहणार_ , आणि त्याला "हेतू" ही संकल्पना जोडून उपयोगाचे ठरत नाही, ती भगवंताची शुद्ध इच्छा मानावी. तसे आत्मसात करणे, म्हणजे "मी" ह्या लोहचुंबक संकल्पनाला विलीन करणे, शिथिल होऊ देणे. 

जस जशी "मी" ही संकल्पना शिथिल होऊ पाहते, तशी जाणीव शुद्ध होते, त्या प्रकारे विचार आणि भावना देहाच्या पलीकडे होऊ पाहतात, ते विशाल होतात, सर्वांच्या भल्यासाठी होतात. 

मूळ प्रकरण काय आहे, ते रुपाशी निगडित आहे. त्या रूपातून स्मरण, हेतू, क्रिया, परिणाम असे कार्य चालू राहते. ते रूप म्हणजे अनुभवाचे स्वरूप, जे तात्पुरतेपण, वेगळेपण दर्शवते. म्हणून त्यातून होणारे विचार आणि भावना. म्हणून तो राग, दुःख, सुख, धडपड, भीती, चिंता, काळजी, कष्ट वगैरे. त्यामुळे _प्रकट होऊ पाहणारे विषय, कोडी, सोडवण्याचा अट्टाहास_. हे *काल्पनिक आहे*. म्हणजे ते खोटे नाहीत, पण स्वतः निर्माण केले गेलेले विषय आहेत, म्हणून त्यात परिवर्तन होऊ शकते. 

दुसरी गोष्ट ही की अस्तित्वाचा परिणाम खोलवरून उमटत असतो, म्हणून बदलांची भावना खूप आतून येत असते. म्हणून बेचैन वाटणे किंव्हा कसलीतरी काळजी वाटणे ही भावना गूढ आहे, आतील आहे आणि ती शेवट पर्यंत असावी, म्हणून ती पूर्ण स्वीकारावे. ती सोडवायला जाऊ नये. 

मला वाटतं की सर्व भावना आतून येत असतात, साखळीत असतात आणि एकमेकांशी चारही बाजूने संबंधित असतात. त्याला सोडवण्याचा अट्टाहास आपण करतो आणि तिथे आपली चूक होऊ शकते. सोडवणे म्हणजेच की आपण वेगळे आहोत हे गृहीत धरणे आणि त्यामुळे जी काही वस्तू त्रास देत आहे, ती गाठ सोडवण्याचा आटापिटा करणे. It is like fighting against your own self. 

Therefore the entire "situation" is about "acceptance" of the self as a vibration. हे स्वीकारणे म्हणजे अधिकाधिक अंतर्मुख होणे, सूक्ष्म होणे, भगवत स्वरूप होणे, विलीन होणे, स्थिर होणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home