Tuesday, September 02, 2025

श्री

 श्री 


चिकित्सा जरी नैसर्गिक असली मनाच्या शक्तित, तरी त्या पाठीमागचा हेतू काय असतो, हे ओळखावे. आपण चिकित्सा "का करतो"? भीतीपोटी किंव्हा वृत्तीपोटी केली गेली चिकित्सा वृत्तीचे कोडे सोडवण्यासाठी मदत होते का, ह्याचा विचार करावा. एकंदरीत ह्या वृत्तीवरून प्रपंच अनुभवास येतो आणि सतत होणारे बदल, अनुभव, चक्र, समस्या ह्याला सामोरे जायला लागत. म्हणून प्रपंच आपल्याला गुंतवून ठेवतो. 

त्याच्या पलीकडे होणे, म्हणजे प्रपंचाचा योग्य परिणाम करून घेणे, म्हणजेच शांत होणे आहे. त्यासाठी आधार भगवंत भावाचा धरणे आले. त्या शक्तीचे संस्कार आत मनात जायला हवे. तरच मनाचे योग्य परिवर्तन होते आणि कार्याचा अर्थ, त्याचे कारण आणि त्याचा परिणाम योग्य कळायला लागते. 

सर्व गोष्टींचे सरळ उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नये बुद्धीच्या भाषेत. आपण एक _साखळी_ आहोत. ती साखळी निर्माण झाली आहे, म्हणजे त्यात परावलंबन, त्यपूर्तेपण, चक्र, बदल, भाव असे अनेक गुण आहेत. त्यातून प्रश्न एका पठडीत कळतील आणि उत्तर शोधण्याचा मार्गही त्याच पठडीत.  थोडक्यात साखळी वरून सवाल - जवाब ची व्याख्या तैय्यार होते.

नामस्मरणाचा उद्देश हा असावा की साखळी मध्ये परिवर्तन होते, त्यातून सर्व काही स्थिर होते. म्हणून प्रश्न पडेनासे होतात. त्यातून शांतता संक्रांत होते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home