Sunday, November 09, 2025

श्री

श्री 

अस्तित्वात _जाणीव शक्ती_ असते. ती शक्ती मनुष्य जीवाला अधिक तीक्षण दिलेली आहे. It has been inherited. 

त्यामुळे अनुभवाचे घटक निदर्शनाला येतात आणि आपण मर्यादित आहोत, एका स्थितीत आहोत, अस्थिर आहोत आणि आकुंचित आहोत, हे ही जाणवते. 

जाणिवेचा स्रोत मात्र शुद्ध, सूक्ष्म, स्थिर, विशाल, सत्य माध्यमा मध्ये असतो, जिथून तो अनेक स्तरांच्या सकाळीत संबंधित राहून शेवटी स्थूल स्थितीत अवतरतो. हरि पाठात ह्या स्थितीना _सात लोक_ असे नावे संबोधित केली आहे. भगवंत सर्वात सूक्ष्म किंव्हा पहिली पायरी आणि आपले जग म्हणजे सर्वात स्थूल किंव्हा सातवी आणि शेवटची पायरी. हे सर्व स्थिती गूढ प्रकारात संबंधित असतात, म्हणून गूढ प्रक्रियेतून वरील सूक्ष्म स्थितीत जायला लागते. 

जो पर्यंत विषय, कोडी, प्रश्न, तात्पुरतेपण ह्यांची चिंता असते, तो पर्यंत सूक्ष्म होणे कठीण. आपण स्थूलाच्या स्थितीला धरून राहतो, म्हणून असे विचार आणि भावना सतत येत राहतात आणि भीती निर्माण होते. कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला बुद्धीतून, तरीही प्रश्न येत राहणार कारण उत्तर कोडी सोडवण्यात _नाही_ आहे.....ते सूक्ष्म होण्यात आहे. म्हणून स्थूल स्थितीत किती गुंतून रहायचे ते ठरवावे. 

दुसरी गोष्ट ही की _गुंतून_ राहण्याचे स्वरूप पूर्ण साखळीत पसरले गेले असते. म्हणजे जर शुद्ध व्हायचे असेल, तर _पूर्ण साखळी_ शुद्ध करणे भाग पडते...म्हणजे अगदी वृत्तीच्या स्तरापर्यंत पोहोचायला लागते. वृत्ती शुद्ध झाली की संबंधांचे स्वरूपही शुद्ध, निरहेतू होते. 

स्थूलातून शुद्ध होण्याचा प्रकार म्हणजे _कर्तव्य_ करत राहावे, नामाचे सतत चिंतन करावे आणि श्रद्धा वाढवत राहणे. प्रारब्धाचा अर्थ, कार्याचा अर्थ, भोगाचा अर्थ आत्मसात करणे म्हणजे घडामोडी त्रस्त करत नाहीत. 

हरि ओम.


 श्री 

हालचाली, बदल, गती ह्यांची संकल्पना, संबंध पूर्ण भगवंत ठरवतो, ते माध्यम निमित्त ठरते म्हणून आपल्या मनात जे विचार येऊ पाहतात, त्याचे प्रयोजन भगवंताने योजिले असते. म्हणजे विचार चक्र किंव्हा प्रक्रियांचे उगम भगवंताकडे आहे, म्हणून विचाराचा स्वभाव, संबंध, प्रश्न, मार्ग हा महत्वाचा विषय आहे मानवी जीवाला. 

त्याचे काय करावे, ह्याचे रेखाटन अनेक संस्कृती मध्ये मांडलेले दिसतात, जाणिवेचा परिणाम कसा असतो, ती शुद्ध कशी ठेवावी, शक्तीचे रूप कसे असते, त्यातून प्रतिभा शक्ती कशी मनात येऊ पाहते वगैरे हे सारे विषय अनेक संस्कृती मध्ये मांडले गेलेले दिसतात. 

ह्या वरील गोष्टींचा अर्थ असा होऊ शकतो, की "आपण" किंव्हा "स्मरण" हा टप्पा मानावा विशाल होण्याचा आणि शक्तीच सर्व करत असते. प्रश्न मान्यतेचा नाहीच आहे, तो आत्मसात होण्याचा आहे, स्वतः मध्ये परिवर्तन करण्याचा आहे. दुसऱ्यांना आपण किती महत्व द्यावे, आत काय होते त्याचे काय करावे, ते कसे दुसऱ्या पर्यंत पोहोचवावे (की ते कसे पोहोचते श्रद्धेने), आतील कालवाकालव चिंतेचा विषय असावा की शोध घेण्याचा; आतील कालवाकाल का होते, कशी होते, कशावर अवलंबून असते; त्याला शांत कसे होऊ द्यावे.....हे सर्व _प्रश्न_ महत्त्वाचे असतात. 

काहीही हरकत नाही, असे प्रश्न असले तरी! तीच तर सर्वात मोलाची देणगी आहे भगवंताकडून! त्याला भेटण्यासाठी ह्या प्रश्नांचे उत्तर शोधणे आले आपल्या मनाला.

हरि ओम.


श्री 

स्थळ, काळ आणि प्रक्रिया - ह्याचे संपूर्ण नियोजन भगवंत ठरवतो. संपूर्ण हालचाली आणि त्यांचा परिणाम तोच ठरवतो. म्हणून आपण त्यावर श्रद्धा ठेवून आपल्या जीवनात कर्तव्य करत रहावे. आपल्या करण्याचा परिणाम कसा होईल, कधी होईल, केव्हा होईल, कुठे होईल...हे मुख्यतः अगोदर योजिले आहे त्या शक्तीच्या गुणात, म्हणून त्या शक्तीवर भरवसा ठेवणे आहे. 

आपण सुद्धा शक्तीचे _रूप_ आहोत. रूप म्हणजे काही साच्यातून आपले वर्तवणूक ठरले असते. त्या साच्यात वृत्ती, विचार, भावना, देह अशा गोष्टी असतात, म्हणून त्यांच्या गुणांना धरून आपण होतो, आपले _स्मरण_ होते, आपले प्रश्न असते, आपण इतर रुपांशी संबंधित येतो, व्यवहार करतो वगैरे. 

भगवंताचे नियोजन सर्वसामान्य प्रपंचात आपल्या ध्यानी येत नाही, म्हणून आपल्यात भय निर्माण होते. आपले शक्तीचे रूप विलीन होऊ देणे आणि भगवंताचे कार्य जाणवणे, हा मार्ग झाला शांती संक्रांत होण्याचा. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home