Tuesday, November 04, 2025

श्री

श्री 

अनुभव व्यक्त होऊ द्यावे, जर त्यातून जरुरीचे वाटत असेल तर. अनुभव असे का वाटते व्यक्त करण्यासाठी, असा जरी विचार आला (जो येणार), तरीही श्रद्धा भाव ठेवून ते सर्व अर्पण करावे. 

त्याचे रूप कसे, आकार कसे, घटक कुठले, असे जरी विचार येत असले, तरी ते व्यक्त करावे कृतीतून. एक सूर टीकेचा असणार आणि एक सूर व्यक्त होण्याचा. तसे असू द्यावे आणि करत राहावे. 

इतिहासाशी सांगड, जीवनाशी सांगड, इतरांच्या विचारांशी सांगड, व्यवहाराशी सांगड - ह्याला फारसे मुल्य देऊ नये...म्हणजे त्यातून असहाय्य वाटून घेण्याची जरुरी नाही. कलाकृती कुणाला पसंत होईल, कुणाला नाही. ते राहणारच आहे. त्यातून आपले स्पष्टीकरण किंव्हा मुल्य ठरवू देऊ नये. 

जीवनाचा अर्थ मला ह्या पद्धतीने शोधायचा आहे/ अनुभवायचा आहे - हा पूर्ण हक्क प्रत्येकाला असतो आणि तो साध्य करावा भगवंताची आठवण ठेवून. तो जो काही अर्थ असतो, तो खूप आतून उमटत असतो, म्हणून त्याची चर्चा करण्याची नेहमी गरज असते, असे नाही आणि तो अर्थ इतरांना कळेलच असेही नाही आणि त्यातून मी ही ठरत नाही, हे ही सत्य आहेच! 

ह्या सत्यावरून, म्हणजे पूर्ण भगवंताचे कार्य असते, आपण आनंदाने कार्य करावे. 

जो मार्ग कार्याकडे बघण्याचा, तोच विचारांकडे आणि भावनांकडे. ते व्यक्त होऊ द्यावे. त्याचे स्थान गूढ असते, म्हणून नेहमी स्पष्टीकरणाची जरुरी नसते. हे सत्य सगळ्यांना कळते किंव्हा मान्य होते, असे नाही. म्हणून आपला सैय्यम हवा. राग येणे स्वाभाविक आहे आणि तात्पुरते वाटणे, हे ही स्वाभाविक असावे...तरीही विवेक बुद्धीने श्रद्धा वाढवत रहावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home