Monday, August 14, 2023

श्री: द्वैत आणि अद्वैत

 

श्री: द्वैत आणि अद्वैत

 

विचार एका मनाची स्थिती आहे. अभिमान  - हा भाव “वरच्या” पातळीवरून उद्भवतो – किवा सर्व  गोष्टी मी करतो आणि माझ्या मुळे होतात आणि सर्व गोष्टींचा उलगडा वेळेवर असायला हवा. आपल्याला बरेच आकार दिसतं राहतात, बदल सहन होत नाही आणि आपण बदल न होण्याचा अट्टाहास करत राहतो. आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसतं राहतात आणि आपल चित्त त्यामध्येच गुंतून राहत. म्हणजे “मी” किवा माझ अस्तित्व वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी निगडीत आहे, अशी आपली कल्पना होते आणि आपण दुख सोसत राहतो. त्याला देह बुद्धी म्हणतात आणि त्यातून अभिमान उद्भवत राहतो.

त्यापेक्षा खोलवर स्थिती म्हणजे वृत्तींची  - ज्या मध्ये खूप खोल्वरून विचार जाणवतात, बदल व्हायला खूप वेळ लागतो आणि आपण दररोजच्या घडामोडीचा त्रास करून घेत नाही कारण ते घडामोडी आपल अस्तित्व दर्शवत नाही. आपल्याला दुख होत, पण ते एका आतल्या बदलणाऱ्या स्थितीशी निगडीत असत, बाहेरच्या नाही. त्या खोलवर प्रश्नाचं उत्तर खोल ठिकाणीच शोधायला लागत – वरचे बदल करून चालत नाही. आपल्याला वरच्या भूमिकेचा अभिमान नसेलही, तरीही आपण वृत्तीला सर्वस्व मानत राहतो आणि ती कशी उद्भवते आणि का बदलत राहते ह्याच उत्तर ठोस मिळत नाही – म्हणून दुख वाटू शकत.

सर्वात खोल्ची स्थिती म्हणजे भगवंताची, जिथे सूक्ष्मपणा सर्वाधिक असतो आणि कुठलीही वृत्ती उठत नाही, म्हणून बदल नसतो आणि अस्तित्व निरुपाधी होत. तिथे पोहोचायचं आपल्याला.

ह्याचाच अर्थ असा कि जीवनात भगवंतच अस्तित्वाचं चिंतन सतत जागृत ठेवायला लागत म्हणजे कालांतराने आपण स्वतः भगवत्स्वरूप होतो किवा भगवंत आपल्याला गवसतो.

म्हणून गोष्टी घडत राहतात ज्याची उत्तर आपल्याकडे नसतात  - पण ती उत्तर नसल्यामुळे आपल काहीही नुक्सान भासण्याची गरज नाही.  वेगळ्या भाषेत मांडायचं झाल तर द्वैत हि एक अस्तित्वाची स्थिती आहे आणि त्याचा परिणाम मनावर होत राहतो. आपल्याला द्वैताच्या पलीकडे जाणे आणि अद्वैत होणे म्हत्वाच आहे. द्वैत “खर” वाटत राहत म्हणून ते अस्तित्वात आहे. जेव्हा सूक्ष्मपणा खरं वाटेल तेव्हा द्वैत अवस्था लोपून अद्वैत भगवंत खरं प्रकट होईल/ दिसेल/ अनुभवता येईल.

श्रद्धा कायम राहूदे.

हरि ओम.

 

 

0 Comments:

Post a Comment

<< Home