Tuesday, August 15, 2023

श्री

 

श्री

सर्वच गोष्टी सांगायला हव्यात आणि सर्वांना कळायलाच पाहिजे (त्यातला हेतू) अस विचार करणे योग्य नाही. एक तर फार थोड्या गोष्टी जाणवतात आणि त्याच सांगता येतात पण सर्व गोष्टींच्या पाठीमागे बर्याच सूक्ष्म स्थिती असतात, सूक्ष्म शक्ति उद्भवतात आणि तेच दृश्य जग निर्माण करतात. निर्माण करणे हा मनाचा किवा अस्तित्वाचा स्वाभाव आहे. अस्तित्व  - हि एक जीवंत वस्तू आहे ज्याच्या मध्ये सतत काहीतरी क्रिया करण्याच कौशल्य आहे. आपण त्याला ज्ञानमय आणि आनंदमय म्हणतो. आपल्याला त्या शक्तीच एकच रूप – द्वैत जग दिसतं राहत ज्याला आपण सत्य मानतो. जग काय, आपण काय किवा इतर वस्तू काय – हि एक मनाची धारणा आहे. एकच माध्यम आहे जे अनेक्पणाने भासत राहत म्हणून एकमेकांचा संपर्क येतो आणि जाणीवा येतात आणि सहकार्य येत. भगवंत सोडून इतर कुठलीही गोष्ट स्वतंत्र नसते आणि सर्वस्वी भगवंताच्या स्फुरणाने उद्भवत असते. सर्व एकच आहे – पण जस आपण सूक्ष्म होतो, तसतसा त्या एक्तत्वाचा साक्षात्कार जास्तीजास्त होत जातो. म्हणजेच आपण स्वतः भगवतस्वरूप होतो. बाकी सर्व गोष्टी विलीन होतात किवा शांत होतात. त्यालाच भगवंत संबोधित केल आहे.

वूत्ती फार आतून आल्या असतात – त्याचा हेतू किवा कारण सांगता येत नाही आणि आपण कसे विचार करतो हे हि ठोस सांगता येत नाही. स्थिर होणे म्हणजे ह्या दृश्य जगात आपल संतुलन बिघडू न देणे. हि एक क्रिया आहे – आणि ती काय दाखवेल आणि कुठली परिस्थिती निर्माण करेल हे फक्त भगवंताला ठाऊक! आपल्याला पूर्णपणे भगवंतावर श्रद्धा ठेवण्याची गरज आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home