Saturday, June 15, 2024

श्री

 श्री,


कितीही केलं प्रपंच्यासाठी ते अपुर असणार आहे. दुसऱ्यासाठी किंव्हा परिस्थितीसाठी काहीतरी करत राहणे, ही वृत्ती स्वतःला शांत होऊ देत नाही. दृश्य प्रकरण सतत बदलणार प्रकरण असल्यामुळे (अनेक शक्तीतून घडलेलं), आपणही त्या बदलणाऱ्या शक्तीचा एक भाग आहोत, म्हणून वृत्ती चंचल राहते आणि स्वतःला असमाधानी ठेवते आणि स्वार्थी करते. 

मग कितीही वृत्तीसाठी (वासनेसाठी) केलं किंव्हा देहासाठी किंव्हा वस्तुंसाठी, शांतता मिळत नाही. तरीही हा प्रश्न बौद्धिक पद्धतीने मांडता आला तरी तो अपुरा असतो आणि तो फक्त बौद्धिक पद्धतीने सोडवू शकत नाही. म्हणजेच की बुद्धीच्या व्यतिरिक्त क्रिया कुठल्या असतात, त्या किती स्तरावर असतात, त्यांचा संबंध काय असतो, हे जाणीवेच्या वाढत्या शक्तीने कळून येतं. 

आता प्रश्न परत इथे येतो की जाणीवा मग कश्या प्रबळ कराव्यात? बौद्धिक, भावनिक, शारीरिक इंद्रियांची कसरत आहे. मुख्यतः श्रद्धा वाढवण्याची. 

दुसऱ्या वृत्ती, परिस्थिती, व्यक्ती, शक्ती शांत होऊ शकत नाही आपल्या स्वतंत्र प्रयत्नाने. उलट त्यात गुंतून आपल्याला वैतागायला होत की वेळ फुकट गेला आणि होणारा त्रास तो औरचं! बरं गुंतायच नाही असं जरी ठरवलं, तरीही मोठ्या निग्रहाने कुणालाही न दुखावता आणि खंत न बाळगता तो हेतू पार करायला लागतो. 

मुळात आपण perfect राहण्याची व्याख्या निरखून पाहायला हवी. Perfect असणे किंव्हा होणे म्हणजे नेमक काय? इतरांच्या मर्जीने वागणे, हो - हो करणे, आश्वासन देणे, ताबडतोप कार्यवाही करणे, धावपळ करणे, वाईटपणा अडवणे, खूप साऱ्या गोष्टी मिळवणे किंव्हा करणे, चुका दाखवणे असा होत नाही. जगाला आग लागल्या सारखं सतत वर्तन करणे, ह्याने आपण perfect होत नाही. जग आहे तसे राहू देणे आणि आपण शांत होणे हे गरजेचं आहे. मी काही मिळवल, ही समज घालून टाकणं आणि सर्व गोष्टी भगवंताच्या इच्छने होतात अशी श्रद्धा वाढवणे म्हणजे शांत होणे.

नामस्मरण पहिली सुरुवात आहे आणि शेवटही, असे संतांचे वचन आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home