श्री
श्री,
आपण पूर्ण आहोत. अपुरे वाटणे किंव्हा न्युंन वाटणे ही भावना निर्माण केली आहे, त्याला खत पाणी (खरी मानणे) देणे काही गरजेचं नाही. सगळं भगवंतहून आलेलं आहे, आपल्या वृत्ती आणि अनुभव देखील....म्हणून *मुळात* आपण पूर्ण आहोत आणि जीव ही स्थिती आहे, जिच्यात बदल हे राहणार आणि असंख्य गोष्टी दिसत राहतील आणि मनाला इकडे तिकडे ओढत राहतील. हा मनाचा स्वभाव आहे, जो आपल्याला स्थिर करायचा आहे, म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवायचे आहे...
दुसरी गोष्ट अशी, की दृश्य जगाचे अनुभव किंव्हा कुठलीही निर्माण झालेली (किंव्हा आपल्या समोर आलेली) "गोष्ट" नाहीशी करता येऊ शकतं नाही. ती आली, की त्या बरोबर तिचे सारे संबंध, बदल, भोग ती मनात उत्पन्न करते. तिला "परत गुप्त करणे किंव्हा नाहीशी करणे मनातून" असे समजणे अशक्य आहे, असे मला वाटते.
पर्यायाने त्या गोष्टीला "निर्विश" करायला हवे. गोष्ट किंव्हा दृश्याचा पसारा राहणार, फक्त त्याकडे आपण सूक्ष्म पद्धतीने बघण्याची सवय करत आहोत, वृत्ती सूक्ष्म करत आहोत, भगवताच अस्तीत्व जाणवत आहोत, जाणीवा वाढवत आहोत.
म्हणून भगवंता कडील प्रवास जाणीव वाढवण्याचा आहे आणि पर्यायाने सगळ्या गोष्टींचा परिणाम न होऊ देणे असा आहे. दुसऱ्या शब्दात मांडायच झालं तर सर्वांचं मूळ, जो भगवंत भाव आहे, ते प्रत्यक्ष अनुभवणे.
दर रोजच्या पद्धतीतून सांगायचं झालं तर बदल किंव्हा वेगळ्या गोष्टीतून शांत होत राहणे हे आहे. गोष्टी बदलत राहायला किंव्हा आपल्या वाट्याला आल्या तर त्यातून "मी" ठरतं नाही, अपेक्षा असण्याची गरज नाही, साठवण्याची नाही, काल आणि उद्याच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही, चिंता नाही, त्रास नाही. कशाचीही गरज नाही.
आपण कसेही असो, कुठलाही गुण असो, कुठलीही परिस्थिती असो, त्यातून अपुरेपणा किंव्हा न्युंपणा ठरतं नाही. आपण तरीही शांती अनुभवू शकतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home