श्री
श्री,
शांत म्हणजे ज्या वृत्ती उमटत आहेत, त्याला प्रतिक्रिया न देणे, त्यात न गुंतणे. वृत्तीत जर "गुंतणे" ही क्रिया झाली, तर त्यातून अनेक *शक्ती चक्रांचे* स्तर निर्माण होतात, ज्याला बुद्धी, भावना, शरीराचे इंद्रिये, दृश्य, संबंध, बदल ह्या गोष्टी कार्यात येतात. त्रस्त जर झालो, तर वरील क्रिया कळून येतील, नाही तर सर्वांना "मी" अशी वृत्ती येते/ होते. क्रियांचा परिणाम म्हणजे "मी" भासणे, म्हणून त्यात आपण (आनेकपणा) मध्ये गुंतत राहतो वगैरे.
थोडक्यात वरील क्रियांच विस्मरण होणे आणि त्याचा परिणाम भोगत राहणे. आपण इथे का आलेलो आहोत, हे विसरणे. आपण काय आहोत, कसे आलेलो आहोत, कुठून आलेलो आहोत, कसला प्रवास आहे हा, हे सर्व विसरणे.
हे ध्यानात जर घेऊ शकलो, तर विस्मरण दूर करण्याची क्रिया सुरू होते. म्हणजे जाणीव जीवापासून (की मी सर्वस्व आहे) ते तटस्टपणे क्रिया ओळखणे (कार्य भगवंताच असतं) हे समजणे.
आपण जेव्हा भगवंत हा शब्द संबोधित करतो, त्यात अस्तीत्व, शक्तींच कार्य, क्रिया, स्तर, विश्व भाव हे साऱ्या गोष्टी आल्या. हेच त्याचं कार्य. हे ओळखणे. झोपेतून उठणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home