Saturday, June 15, 2024

श्री

 श्री,


आपण एका शक्तीच रूप झालेलो आहोत. त्याला "भाव" असं म्हणतात. तो भाव अस्तित्वाने निर्माण होतो, म्हणून त्या क्रियेमुळे शक्तीच विशेष रूप तैय्यार होऊन त्याचा परिणाम होत राहतो. 

जीव, हा आहे परिणाम. जीव, ही क्रिया वृत्ती, मन आणि शरीर अशी होत राहते. म्हणजे परिणाम दृश्य दाखवते. दृश्य दाखवणे, म्हणजे अर्थही निर्माण करणे आणि त्यात गुंतून ठेवणे - हा झाला एकंदरीत ह्या साऱ्या शक्तींचा परिणाम. 

प्रत्येक गुण, जे भगवंता कडून जीवाला बनवलेलं गेलं आहे, त्याचा परिणाम त्याला कार्य करायला लावतो आणि त्यातून भोग अनुभवायला लावतो. 

म्हणून जाणीवेची रचना स्वीकारायला लागते आणि आपल्या आयुष्यात जे होत, त्यात दोष न बघणे अशी वृत्ती बनवायला लागते. 

वृत्तीचा परिणाम खूप सूक्ष्म स्तरातून येत असावा, म्हणून वृत्ती उपटून नाही टाकता येत. ती शांत होई पर्यंत जे भोग येतील, ते स्वीकारायला लागतात. निर्मितीच कार्य आणि अनेकपणं दाखवणे आणि त्याचा परिणाम भोगायला लावणे, हे भगवंताच नियोजन आहे. त्याची कृपा झाल्यावर आपण शांत होऊ. तो पर्यंत, कार्य करणे.

हरि ओम. 

आणि ती आपली खरी ओळख आहे. आपण तेच आहोत. शांत. तिथे होणार आहोत आपण. म्हणून सैय्यम ठेवत कार्य करत रहा. भगवंतासाठी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home