Monday, June 17, 2024

श्री

श्री,

मला काय वाटतं त्यात काही विशेष नाही - ते सत्य नाही, किंव्हा काळ्या दगडा वरची पांढरी रेग नाही, की वाटलं ते कायम असायला हवे!

दुसऱ्यांना सांगायलाच पाहिजे, आपले विचार मांडायला पाहिजे, आवाज उठवायलाच पाहिजे, विचारांचं निचरा करायलाच पाहिजे - ह्या सर्व वृत्ती शांत करायला हव्या. 

ते होत राहतील...स्वतःच्या मनोरचने प्रमाणे अनुभव येतील/ होतील, अर्थ दिला जाईल, तो बदलेल, इतर सूक्ष्म गोष्टी नंतर कळून येतील, प्रवास घडतं जाईल...ह्या सर्व गोष्टी होतील. 

आपल्या निर्मितीचा प्रवास असंख्य काऱ्यकारणसंबंध ह्या धाग्याला धरून होतो....त्याच विघटन केलं तर सगळे कारण त्याच क्रमाने कळतीलच असे नाही. विघटनचा प्रवास वेगळा असतो/ असू शकतो. 

म्हणून आत्मकेंद्रित होतांना जाणीव वाढवणे एवढच आहे - सगळे कारण निर्मितीचे त्याच क्रमाने कळणे हे नाही!! कारण प्रकरण गुंता गुंतीच आहे आणि बदलणारं असल्यामुळे निर्मितीचा कुठल्याही स्तरातला क्षण आणि विघटनचा क्षण हे निश्चित वेगळेच राहतील, so the process of introversion is NOT the reverse of general extroverted tendency of the mind. They follow different paths. This, therefore means, one arrives at the Origin from a different position or a path which is different from the path of creation starting from the Origin. Therefore there is no need to find exact points of creation process since they won't be found at all. 

In other words, our tendency or inheritance or past lives are not necessary to be considered for defining an awakening journey. The tendency can be considered only to know the course the path would take and accept the outcome whatever is in store on that path. It is always a forward movement that takes one to the final destination and not a reverse. Path keeps changing and by the grace of God and trust in Him, it leads to His home. For this, any method suited to each one is certainly acceptable.

म्हणून,

१. कुठलीही परिस्थिती ही सुरुवात समजू शकतो आपण ह्या प्रवासासाठी
२. मागे काय झालं ती पूर्णपणे भगवंताला देऊन टाकण्यात स्वारस आहे. त्याला न चिकटण. तसे पाहिले तर हा नियम "कुठल्याही पूर्वी घडून गेलेल्या" गोष्टीला आहे.
३. सूक्ष्म होणे म्हणजे उलट फिरणे होत नाही. सूक्ष्म होणे म्हणजे जाणीव विशाल होणे. वृत्ती आपोआप बदलणे. 
४. नामस्मरणाचा परिणाम मागे आणि पुढे ह्यावर अवलंबून नाही. तो आत्तावर आहे. म्हणजे त्याचा परिणाम स्वतःला शांत करेल, जो अनुभव "आत्ता" सामावलेला असतो/ किंव्हा "आत्ताच" स्वरूप घेऊन येतो. 
५. म्हणून श्रद्धा ठेवणे म्हणजे चंचल न होणे. इकडे तिकडे बुद्धी फिरण्याची गरज नाही आणि मागचा किंव्हा पुढचा विचार करण्याचीही नाही!
६. बुद्धीची पद्धत सोडायला लागते. हे केलं की ते होईल, अशी समज बाजूला ठेवायला लागते.


हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home