Saturday, June 15, 2024

श्री

 श्री,


स्वतःची वृत्ती काय क्रिया करत राहते इतर वृत्तींवर आणि काय आकार निर्माण करते, घेऊन आणते, अनुभव देते हे दिसत तसं सरळ बौद्धिक प्रकरण नाही. 

वृत्ती बुद्धी पेक्षा सूक्ष्म असल्यामुळे, तिची शक्ती आणि परिणाम बुद्धीच्या पलीकडे राहतो आणि वृत्ती ही शक्ती खूप साऱ्या गोष्टीच्या मुळाशी असते. 

वृत्ती सूक्ष्म आणि विशाल रुपाची असते, म्हणून ती अनेकात राहते किंव्हा तिच्यातून अनंत गोष्टी निर्माण होतात. म्हणजेच की एकच वृत्ती घेऊन, ती वेग वेगळ्या बुद्धिंची शक्ती आणि वेग वेगळ्या भावनांची शक्ती तैय्यार करू शकते. म्हणून गोष्टींना बुद्धी भेद वापरून फारस हातात काही मुळात नाही, कारण ज्या प्रमाणे _बुद्धी गोष्टींचं विघटन करते, त्या प्रमाणे तिची निर्मिती झाली नसेलही!!_ 

ह्यातून हे दिसत की एकाच गोष्टीकडे खूप पद्धतीने आपण बघू शकतो - तिचा _निर्मितीचा प्रवास_ सांगू शकतो. मग त्यावरून आपण असं म्हणू की गोष्टी काय कायम किंव्हा सत्य नसते, ती अनंत कारणांमुळे, वृत्तीमुळे आणि संबंधातून निर्माण झाली असते आणि वृत्तीचं बीज घेऊन बदलत राहते. 

वरील क्रिया खूप साऱ्या गोष्टी नोंदवतात. एक म्हणजे माझ्या पोटात वृत्तीचं बीज आहे, जी एक दृष्टी निर्माण करत राहते आणि इतर गोष्टी तिच्याकडे ओढून घेते. वृत्तीमुळे स्वतःची बुद्धी आणि भावना निर्माण होतात. वृत्ती जेवढी संकुचित किंव्हा स्वार्थी, तितक्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतो, बदलांचा त्रास होतो, आपण अट्टाहास धरतो, राग येतो वगैरे. वृत्ती जेवढी विशाल आणि सामावलेली करू, तितका दृश्याचा परिणाम स्वतःवर होत नाही, आपण स्वतः सूक्ष्म झालेलो असतो. 

म्हणून वृत्ती शांत होऊ देणे, विशाल होणे हे आपलं ध्येय आहे किंव्हा गरज आहे. 

हरि ओम.



श्री,

वृत्ती या विषयाचे दोन गोष्टी जाणवले:

१. वास्तुशास्त्र या विषयात Pattern Language संकल्पना आहे. की मानवी स्वभाव जर archetype किंव्हा patterns, या स्वरूपात ओळखता आला (जो असतोच) तर कलाकृती अधिक मनाच्या जवळ आणि सत्य होऊ शकते. हा अभ्यास संस्कृती, समाज, विविधता या संकल्पनेच्या पलीकडे जातो आणि सर्व मानवांना एकत्रित बघतो. मग त्यात इतिहासापासून ते भविष्य हे देखील एकत्र येतात, कारण मुळातल वृत्तीचं बीज तेच असतं!
2. वृत्ती कुठून येते मग? तर भगवंताचे अस्तीत्व ह्या मध्ये अनंत वृत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यातून अनंत बुद्धी, अनंत भावना आणि अनंत आकार. जर अनेक आकारात एक वृत्ती दिसते, तर अनेक वृत्तीच्या पाठीमागे निश्चित कोण दिसेल?!!...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home