श्री
श्री
वस्तू हवी असे वाटणे म्हणजे स्वतःच्या जाणीवेमध्ये वृत्तीची सरमिसळ झाली आहे, असे समजून घेणे. जे बघतो, विचार करतो, मनन करतो, निर्माण करतो, आकार अनुभवतो, हे सर्व जाणीवेच्या शक्तीतुन होत असतं. ती शक्ती, आपल्यासाठी सध्या वृत्तीचा स्वभाव धारण करून आली आहे, जीच्यातुन आपला (किंव्हा एखादा जीवाचा) जन्म होतो, दृश्यात किंव्हा प्रपंचात गुंतून राहतो आणि शेवटी मावळतो. ह्या होण्यात आणि अनुभवण्यास बऱ्याच क्रिया घडतं राहतात, ज्यांचा ठाम पत्ता लागणे जीवाला अवघड आहे, कारण सर्व दैवी स्वरूपातील क्रिया निर्माण होत असतात. म्हणून जे दिसतं, ते निर्माण क्रियेतून आलेलं असतं, त्याचा एक स्वभाव असतो, त्याचा एक परिणाम असतो, त्याच्यात गुंतून राहतो जीव. काय केलं की ह्यातून बाहेर पडता येईल, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा हे समजून घेणे की प्रश्न मनाच्या स्वभावातून आलेला आहे, तर ते उत्तर कसे शोधू शकेल?!!...
शांत होणे ही क्रिया अपेक्षित आहे. आपलं अस्तित्व कष्यावरही, कुठल्याही विषयावर, परिस्थितीवर, गोष्टीवर, व्यक्तीवर, आकारावर निर्भर "नसलेलं हवे". म्हणजेच की अस्तीत्व जाणीव हा पलीकडील भाव आहे.
घाई करून, आटापिटा करून, रागावून, साठवून, डाफरून, दुर्लक्षित करून काहीही होत नसतं. काळजी किंव्हा चिंतेचा _अस्तीत्व_ हा विषय मुळीच नाही. मुळात अस्तीत्व हा _विषय_ असू शकत नाही! आपण त्याला विषयाच्या चौकटीत आणतो, म्हणून त्याला प्रपंचाच स्वरूप देतो! वेडेपणा नाही का हा?!
प्रपंचाला विषय समजू नका. वृत्ती ही विषयाधिन होता कामा नये, तरच भगवत भाव प्रकट होईल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home