Sunday, June 23, 2024

श्री

श्री,

शांत होणे ही प्रक्रिया श्रद्धेच्या मार्गाने चालायला लागते. म्हणजे बुद्धीची शक्ती  आणि भावनांची शक्ती ह्या पलीकडील परिवर्तन शक्तीवर किंव्हा भगवंताच्या शक्तीवर अस्तीत्वपणा द्यायला लागतो. The force of Existence is present everywhere. It needs to be trusted.

ही जाणीव सर्वांगाने मिळते - म्हणजे बुद्धी किंव्हा भावना किंव्हा आकार ह्या मार्गातून प्रामुख्याने सुरू करून, ती सर्वांगीण करायला लागते. मनाचे सर्व अंग त्या जाणीवेने व्यापले हवे, आणि त्याच बरोबर अस्तित्वाचे सर्व स्तर किंव्हा स्थिती, ज्याला आपण "दृश्य" समजतो. 

श्री ज्ञानदेव संतांनी विश्वाची व्याख्या अद्वैत आणि द्वैत ह्या स्थितीन केली आहे. द्वैत ह्या स्थिती मध्ये ७ लोक, ५ सूक्ष्म रूप पंचमहाभूतांचे आणि ३ गुण अश्या संबंधातून "अनेक" विश्व पाहिली (in scientific terms - simultaneously existing multiverses)!...

ह्याचाच अर्थ असा की सर्वांगीण चिंतनाने, त्यांना मनाच्या खोलात शिरून सर्व प्रकारच्या आतील मनाच्या शक्ती  अनुभवता आल्या, ज्यावरून अद्वैत आणि द्वैताची रचना त्यांना जाणवली. 

आपण सतत "हे केलं की ते होईल किंव्हा हे केलं की असं व्हायला हवे किंव्हा हे करणे भाग आहे"...ह्या चक्रात असतो. जाणिवेची स्थिती अशी पाहिजे की सर्व भगवंताची शक्ति करते, त्यातून जीवाची शक्ती निर्माण होते आणि आपण प्रपंच ठरवतो! 

दररोजच्या अनुभवेत म्हणून भीती आणि शांती हे दोन्ही भावना राहतात. त्यात शांती वाढवण्याची शक्यता श्रद्धेने होते. 

पुढचा श्वास जर भगवंताची शक्ती ठरवणार असेल, तर आपण कुठले काल्पनिक मनोरे रचायचे?!!...so much of an effect our imagination has on us...which actually originates from a Presence...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home