श्री
श्री
मन ही शक्ती आहे, जी काहीही निर्माण करू शकते. निर्मिती ही अस्तित्वाची क्रिया आहे किंव्हा स्वभाव आहे, म्हणून त्यातून मनही झाले आहे. ते होताना किंव्हा जाणिवेतून आकारास येताना, वासना, स्फुरण, विचार, भावना, शरीर अशे चक्र निर्माण केले गेले आहेत. एकंदरीत त्याचा परिणाम म्हणजे " मी " हा भाव उद्भवणे. हा भाव देखील एका विशिष्ट पद्धतीने वावरतो अस्तित्वात, म्हणून तो जिवंत राहतो. त्या भावाचे स्वरूप म्हणजे वासनेला चिकटण, त्यातून विचारांना आणि भावनांना सत्य मानणं आणि त्या प्रमाणे दृष्यास अर्थ देणं आणि प्रतिक्रिया देत रहाणं आणि तेच संस्कार पुढे ठेवत रहाणं. ह्या सर्व " अनुभवाला " द्वैत असे संबोधित केले आहे, कारण आपल्याला वेगळेपणा " भासतो ", जो मुळात सत्यात " नाही " आहे! म्हणजे आपल्याला जाणिवेची एक अस्तित्वाची स्थिती धरून ठेवली आहे, जी द्वैत अनुभव मानत राहते.
म्हणून औषधाचा उपचार असा हवा की जाणिवेत परिवर्तन व्हायला हवे. बाहेरच्या गोष्टींना औषध दिले तर ते वर वरचे उपचार ठरतील - त्यातून पाहिजे तो परिणाम कदाचित होणार नाही. म्हणून अंतर्मुख होऊन आपल्याला बघायचे आहे की नेमके वासना निर्माण कशे होतात आणि त्यातून इतर भावना कशे रुपात येतात?
हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे किंव्हा आपल्या हातून महत्वाचे कार्य आहे. शांत झाल्याशिवाय दृश्यात वावरायला काही आनंद नाही. आणि मुळात आनंद भाव हा सर्वांना हवा. सर्व गोष्टींचे मूळ काय आहे, ते पक्के ध्यानात येऊ द्यावे आणि तिथे लक्ष केंद्रित करावे.
हरि ओम.
श्री
एखादी गोष्ट " जिवंत " असते म्हणजे काय? माझ्या मते जिवंत असते म्हणजे तिची क्रिया तिला स्वभाव देत राहते. क्रिया शक्तितुन येते. म्हणून जिवंत असते आणि त्यामुळे तिची क्रिया + परिणाम करत राहते म्हणजे " शक्ती ". त्या क्रियेतून भाव निर्माण होतो. म्हणून भावही निर्माण होणारी गोष्ट आहे, जी बदलू शकते.
शक्तीचा परिणाम आपण सध्या भोगत आहोत. मनुष्यने त्या शक्तीच्या अनुभवाला " भोग " असे नाव दिलं आहे.
अध्यात्माच्या भुमिकेवरून असे सांगणे आहे, की हीच शक्ती " जागी " करायची आहे. शक्तीचे जागे होणे म्हणजे आनंदाचा शोध आणि आपण आनंद स्वरूप होणे, किंव्हा शांत होणे, किंव्हा श्रद्धा विस्तार पावणे. आपणच भगवतस्वरुप आहोत, त्या भावनेत स्थिरावणे म्हणजे "शक्तीचे जागे होणे".
हरि ओम.
श्री
अनुभवाचं मोजमाप असतं का? मोजमाप शोध घेण्यासाठी आहे, दुसऱ्याला काय वाटेल ह्या साठी नाही. मोजमाप द्वैत संकल्पना समजण्यासाठी आहे, त्यात गुंतून राहण्यासाठी नाही. मोजमाप भगवत स्वरूप होण्यासाठी आहे, त्याला विसरण्यासाठी नाही. मोजमाप मोकळे होण्यासाठी आहे, किचकट राहण्यासाठी नाही. मोजमाप प्रेम होण्यासाठी आहे, अनेक बुद्धिभेद सिद्ध करण्यासाठी नाही. मोजमाप सारे गोष्टींना मुभा देत राहण्यासाठी आहे, त्यांना अडवण्यासाठी नाही. मोजमाप वासना सोडण्यासाठी आहे, त्याला भक्कम करण्यासाठी नाही.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home