Saturday, October 19, 2024

श्री : प्रेम

 श्री : प्रेम


भगवंताचा भाव, असे वाटते, अगदी हळू हळू प्राचीतीला येतो. ह्याने असे दिसून येते की आपला बहिर्मुखपणाचा जोर तीव्र असावा आणि आपण अनेक स्तरात - सूक्ष्म ते स्थूल - गुंतले गेले आहोत. वासना किंव्हा त्याचे स्पंदने उलटून इतर स्तरात प्रकट होतांना त्यांचे निरनिराळे चक्र होत राहतात.

स्पंदन, ही खूप सूक्ष्म क्रिया आहे आणि त्यावरून अनेक संबंध घडतात स्तरात, स्थितीत, आकारात वगैरे. घडामोडी आणि हालचालींचे बीज स्पंदनात आहेत आणि ते प्रामुख्याने आपला " भाव " किंव्हा प्रतिक्रिया निर्माण करतात. तोच भाव सत्यपणाची व्याख्या निर्माण करतो आणि आपण त्यात जगतो. अश्या प्रकारे आत - बाहेर अस्तित्वाचा अर्थ निर्माण होऊ पाहतो. म्हणून आपण पूर्ण भरलेले आहोत स्पंदनांच्या द्वारे. ही झाली भगवंताची क्रिया किंव्हा इच्छा आणि कार्य. 

प्रेम येणे किंव्हा होणे हा स्पंदनांचा भाग आहे. संस्कार तिथं पर्यंत स्पंदने बदलायला हवेत. बाहेरून संस्कार करत ते आत येऊ शकतात. सैय्यम आणि वेळ हे त्यात महत्वाचे घटक झाले. 

काय बोलतो किंव्हा करतो हे हेतुशी निगडित आहे तरीही ते कसे हे पक्के आकलनात येत नाही आणि तसे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ते सांगता येत नाही ह्याचाच अर्थ असा की सर्व व्यवहार भगवंताची शक्ती करते किंव्हा प्रकट करते. ते जरी मांडले तरी गा बौद्धिक पर्याय नाही, तो श्रद्धा ठेवण्याचा भाग आहे. श्रद्धा देखील पर्याय नाही, तो बुद्धी पेक्षा सूक्ष्म आणि विशाल भाग आहे. म्हणून श्रद्धेने बुद्धी चालवा. 

प्रेमाला कार्य, क्रिया, बोलणे, ऐकणे, बघणे, स्पर्श करणे, बदलांचा वेग, हेतू, काळ, स्थळ असे कुठलेही साचे लागत नाही. " नाही " ह्याचा अर्थ प्रेम हा भाव विचारांच्या पलीकडे आहे. हे बुद्धी ठरवू शकते. एकदा ते पक्के कळले की तो भाव कसा आत्मसात करावा ह्याकडे लक्ष बुद्धीचे वेधले जाते आणि प्रवास आपण पदार्पण करतो. 

म्हणून काय मिळाले, कसे, कधी, कुठे ह्या प्रश्नाने व्याकूळ होऊ नये. शांत होत राहावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home