श्री
आपल्याला काहीतरी करण्याची “हाउस” असते – त्याला आपण कृती
म्हणू ज्याला हेतू आपोपाप निर्माण होत राहतो. हेतू शक्तीतून येते, पण त्याचा भाव
असा होतो कि त्याला “आपण” म्हणतो. त्या भावाला स्वभाव येतो आणि तो म्हणजे इच्छा, आकांक्षा,
तात्पुरतेपण, भीती, माया, चंचलता, संकल्पना, भावना वगैरे. हे त्या शक्तीचे होणारे
परीणाम आहेत. शक्ती म्हणजे अस्तित्व, आणि तिचं चक्र म्हणजे “मी”. साहजिकच शक्ती
इतर स्तरात वावरते, कार्य करते, संबंधित राहते आणि त्यावरून आकार घेते. ह्यावरून
असे लक्षात येते कि विचार आणि भावना कुठूनही येत राहतात, त्या बरोबर अनेक गोष्टी
आणतात आणि सूक्ष्म ते स्थूल ह्या स्थितीही जोडत राहतात. म्हणून मुळात शक्ती आहे भगवंताची
आणि म्हणून जे काही निर्माण होते विचारांच्या पातळीवर, ते भगवंताकडूनच आलेले आहे
असे मानून घ्यायला काहीही हरकत नाही. म्हणजेच कि आपण पूर्णपणे भगवंतावर अवलंबून
आहोत आणि तो जे म्हणेल तसे कार्य करणे आपले कर्तव्य आहे. त्याच्या इच्छेने विचार
आणि भावना घडतात किव्हा येतात आणि मावळतात.
म्हणून वृत्ती किव्हा वासना होत राहणे हि दैवी प्रक्रिया
आहे आणि ती आपल्याला दृश्य जगाचा अनुभव पदरी पाडते. आता आपल्या वासनेच साध्याच स्वरूप
हे आहे कि उगम कसा आणि कुठून होतो हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे म्हणू आपण
घाबरतो आणि त्याप्रमाणे हालचाली करतो. त्यातून असे घडते कि आपण संबंधीत राहतो आणि
कुठलेनाकुठले तरी विचार ओढून घेतो निर्माण करतो आणि अर्थ लावत बसतो. त्यातून
दृश्याची बाधा जी होते ती होतेच, त्यामुळे!
म्हणू विचार करायला काहीही हरकत नाही, फक्त कितीही शुद्ध
विचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावरून दृश्याची बाधा होणार हे विसरू नये!
तरीही त्या मार्गावर जायला लागते कारण विचारांचे चक्र बदलत राहिले आणि विशाल झाले
कि बाधा सूक्ष्म स्थितीची होते जी पार करणे आणि जोमाने आणखीन सूक्ष्म होत
राहण्याची गरज निर्माण होते. त्यातून वासनेचा पुर्ण अभाव होऊन आपण पुर्ण रिकामे
झालो कि भगवंताच्या अस्तित्वाची प्रचीती येते.
त्याला शांत होणे असे म्हणतात. कि काहीच न करण्याची स्थिती
येते, तसे आपल्याला जाणवते, आपण समाधानी होतो. दुसर्यांना स्पष्टीकरण सारखे
देण्याचि गरज नाही. पूर्णपणे सांगण्याचीही गरज नाही. आपण अपुरे आहोत आणि तात्पुरते
आहोत, त्याबद्दल खंत बाळगण्याचीही गरज नाही. आतून ते बाहेर येतांना परिवर्तन
विचारांचे कसे होते हे पुर्ण मांडण्याचीही गरज नाही. आत काय हालचाली होत आहेत, ते
हि निदर्शनाला आणायची गरज नाही. ह्यावरून घडामोडींचे स्वरूप कसे होते आणि उद्या
काय होईल; आणि पूर्वी काय झाले - ह्याने त्रासून जाण्याचीही गरज नाही.
शांत होणे हि क्रिया आहे. त्याला सैय्यमाने घ्या.
हरी ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home