श्री
श्री
" मी " ह्यातून अंतर दिसते - भगवंताच्या शक्तित आणि माझ्या मर्यादित शक्तित. शक्ती ही जाणीव आहे, जीच्यातुन गुंतलेले आतून ते बाहेरून स्तर असतात - आपल्या बाबतीत ते वासना पासून ते बुद्धी ते भावना ते आकार असे दिसून येतात, ज्याला आपणही प्रतिसाद देतो आणि आपल्यावर त्या चक्राचा परिणाम होत राहतो आणि आपण कार्य करतो.
भगवंत पासून अंतर झाले की विचारांची धारा सुरू होते आणि आपण देहाला किंव्हा संकल्पनेला किंव्हा विषयाला सत्यपण देत राहतो. प्रश्न अनंत असतात आणि ते स्थितीतून उमटतात - अर्धवट आणि तत्पूर्तेपण. ती निर्मिती आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही!! म्हणून निर्मिती मुळे आपण ठरतं नाही किंवा आपलं काही बिघडत नसते.
अपूर्ण असल्यामुळे, वेग वेगळ्या गोष्टी येत राहतात आणि निघून जातात - त्याना प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे काही नाही. प्रतिक्रिया घडामोडींवर निश्चित ठरवू नये - ह्याला स्थिर होणे असे म्हणतात.
जे होणार आहे, ते होणार. बदल, संबंध, आकारांच्या गती - हे राहणार. जेव्हा उमगेल अर्थ तेव्हाच उमगेल. त्यासाठी इथे जावे, हे करावे, ते करावे, ह्यांना भेटावे, त्यांना भेटावे, हे वाचावे, ते वाचावे, हे सांगावे, ते सांगावे, हे ऐकावे, ते ऐकावे - ह्यांनी शांतता मिळेलच असे नाही. काहीतरी केल्याने शांती हातात लागेल हा भ्रम आहे. मुळात " मी " हा भाव निर्माण झालेला आणि चिकटलेला आहे - तो भ्रम आहे. मी काहीही करत नसतो. जे कोण करतो, तो महान, विशाल, सूक्ष्म आणि शक्तिमान आहे. म्हणून त्याच्या इच्छेने मी इथे आहे आणि अनुभव घेतो आणि देतो. देवाण घेवाण, संबंध, संपर्क, संस्कार त्याच्या तरफे होतात, त्यांचा जन्म तो देतो, तो करतो, त्याच्यातून होतो.
मग "मी" ही वृत्ती काय आहे आणि कशासाठी? हे ओळखणे. सर्व तोच आहे, तर त्याचं स्मरण ठेवा. पुढचा क्षण, स्थिती मला माहीत नाही, तरीही समाधान त्यावर अवलंबून नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home