श्री
श्री
स्वतःच्या अस्तित्व स्थितीवर श्रद्धा ठेवावी. त्यावर श्रद्धा म्हणजे ती स्थिती एका दैवी क्रियेतून आलेली आहे. त्यात अनंत क्रिया आहेत, सूक्ष्म पासून ते वृत्ती ते विचार ते भावना ते आकार/ दृश्य. त्यात परिवर्तन होत "मी" हा भाव घडतो आणि चक्र असल्यामुळे त्याची निर्मिती आणि परिणाम ह्या दोन्ही गोष्टी त्या शक्तित सामावलेले असतात. जो पर्यंत आपण त्या चक्रात वावरतो आणि त्या प्रकारच्या स्मरणात असतो, आपण मायेच्या प्रभावात राहतो, असे संबोधले आहे. त्या चक्राला धरून ठेवणे, त्याला सत्य मानणे, विषयाधीन होणे, हे त्याचे _परिणाम_ होत असतात. म्हणून तात्पुरतेपण वाटणे, भावना उमटणे, कष्टी होणे ह्या गोष्टी निर्माण होतात.
निर्मिती माझी नाही, ती एका क्रियेचा _परिणाम_ आहे. त्या क्रियेला " मी " हा भाव होतो, म्हणून क्रियेला आपण तटस्टपणे "क्रिया" म्हणून बघू शकत नाही.
त्यासाठी नामस्मरण - क्रिया करायला लागते जी "मी" ह्या क्रियेच्या विरुद्ध आहे किंव्हा "मी" ह्या क्रियेला शांत करू शकते. तसे पाहिले तर सगळा शक्तीचा खेळ आहे. मूळ शक्ती भगवंताची आहे, जिच्यातून अनेक प्रकारच्या शक्ती उदयास येतात. आपण पहिल्यापासूनच विघटित असल्यामुळे मन चंचल असते आणि परावलंबी असते आणि दृश्यांची बाधा होते. "विघटित" असणे मग स्थिती मानायला हवी. ते मान्य असेल, तर एकरूप भाव मिळवण्यास प्रयास करणे आवश्यक. _त्यासाठी नामस्मरण क्रियेत स्थिर होणे,_ हा एकमेव उपाय आहे.
हरि ओम.
श्री
त्रासाचं मूळ माझ्या बुद्धीला नाही कळत. हे मी मान्य करतो. तुझ्या बद्दल विचार करून ते दूर होईल (म्हणजे मावळेल, शांत होईल) अशी आशा मी बाळगतो. त्या आशेच रूपांतर श्रद्धेवर होण्याचे सामर्थ्य माझ्यात निर्माण होऊ दे अशी प्रार्थना तुझ्यापाशी करतो.
वरील वाक्य विश्लेषण आहे खास. श्रद्धा जागी होणे ही क्रिया गूढ असली हवी आणि तुझ्या कृपेवरून होईल. ते होण्यामध्ये क्षणांचे बदल मनाच्या विरुद्धही होतील, पण सर्व घडामोडी तुझ्या इच्छेने होत असल्यामुळे, ते योग्यच असेल असे मी मानून घेईन. त्या प्रवासात त्रास होईल, दुःख होईल, पण ते तुझ्या इच्छेचा भाग आहे आणि त्या मार्गानेच तू मला भेटणार असशील, तर मी सैय्यम नक्की ठेवीन.
मी हे लिहीत आहे तुला, कारण हा तू दिलेला टप्पा आहे, तर तसे मी करत आहे. त्यातून पुढे तुझ्या इच्छेवर घडामोडी होणार आहे. तुझी कृपा राहूदे माझ्यावर आणि पर्यायाने आमच्या सगळ्यांवर.
मी उगाचच शंका घेत राहतो. आणि सर्व गोष्टी सुरळीत होण्याचा अट्टाहास धरतो. अट्टाहास भाव आहे, तो एका पद्धतीच्या जाणिवेतून निर्माण होत आहे. तरीही शांत होण्यासाठी तुझ्या कृपेची जरुरी आहे. मला शांत होण्यासाठी, शांततेत वावरण्यासाठी आणि त्यातच स्थिर होण्यासाठी बुद्धी दे आणि शक्ती दे. तुझ्या इच्छेनुसार बाहेर मी नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home