श्री
श्री
भगवंत भाव म्हणजे " *असणे* - स्थिर - अक्षर - अदृश्य " *आणि* " *होणे* - बदल - प्रकट - परावलंबन - आकार - दृश्य - स्वभाव - चक्र - तात्पुरते "...
दृश्य काय किंव्हा अदृश्य काय - तो भगवंतच आहे. दृश्यात वावरतांना, अनेक होतो आपण, अनेक गोष्टींचा *प्रवाह* जाणवतो, आकार येतात आणि जातात, मी होतो आणि जातो, बदलांचा परिणाम भोगतो वगैरे. दृश्याचा भाव होतांना मी भगवंताच्या स्थिर भावापासून निराळा वावरतो, म्हणून वेगळेपणा भासतो. त्यातच " मी " चा उगम आहे आणि असंख्य विचार चक्रांची जाणीव आहे. त्या विचारांच्या प्रवाहामुळे संबंध येत राहतात आणि ते मनाला गुंतून ठेवतात. It becomes a State of Vibrations in Existence.
त्या मध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. आपली खूप इच्छा असते की प्रत्येक कृतीचे स्पष्टीकरण देत राहणे, पण मला असे दिसून येत आहे की ह्या भूमिकेची मर्यादा असते. चक्र भाव पचवायला लागतो. त्यासाठी मुद्दामून बरेच गोष्टी करणे, बऱ्याच लोकांना भेटणे, बरेच अनुभव घेत राहणे असे नाही.
भगवंताचे स्मरण करता करता, असलेल्या बदलणाऱ्या परिस्थितीत शांत होणे गरजेचे आहे. प्रवाह आपल्याला शांत करायचा आहे. आणि शांत होणे हाच दिव्य अनुभव आहे. शांती भावनेतून होणारे संबंध आपल्याला शांतच ठेवतात. दृश्यात होणाऱ्या गोष्टींचा निचरा किंव्हा मतभेद करण्यापेक्षा ही क्रिया शांती भाव प्रकट होतांना आपोआप होते.
श्रद्धा ठेवा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home