श्री
श्री
अस्तित्व कुठल्याही रूपाने जाणून घेणे म्हणजे अनंत पद्धतीने समजणे - त्याला अंत नाही - म्हणून शोध, किंव्हा असमाधान भाव राहणार. हे नैसर्गिक आहे, कारण जन्म होणे किंव्हा एखादं रूप धारण तेव्हाच होते जेव्हा विघटन क्रीयेशी रूप समरस होते. विघटन पद्धतीनेही अस्तीत्व जाणवते - पण ती एक बदलणारी, परावलंबी, शक्ती रूप, स्थळ - काळ चौकटीतील पद्धत आहे. त्याच्यात अहं वृत्ती निर्माण होते, मी होतो, वेगळं किंव्हा मर्यादित स्मरण होत आणि शक्ती दिसत नाही, नाव - रूप वेगळेपणाने दिसत राहतं, त्याचा परिणाम आपण ओढून घेतो आणि त्याची बाधा भोगतो. हे आपले जीवन!
म्हणून स्थिर भाव हा श्रद्धेने प्रकट होतो. स्थिर म्हणजे एक होणे, एक दिसणे, सत्य होणे, स्थिरावणे, शांत होणे. त्यासाठी नामस्मरण ह्यावर श्रद्धा बसायला योग्य वेळ द्यायला लागतो. ती भगवंताची कृपा म्हणायला हरकत नाही. श्रद्धा बसण्यासाठी सतत, शंका न घेत, चलबिचल कमी करत, सैय्यम ठेवत नामस्मरण करायला लागते. त्यातून अतींद्रिय शक्तीची जाणीव प्रज्वलित होते. मी - हा भाव मंदावतो आणि त्याची जागा शांती भाव घेतो. शक्तीचे कार्य काय आणि ती किती सूक्ष्म स्तरापासून सुरू होते हे जाणवते. म्हणजे आपला भाव सूक्ष्म होतो.
हरि ओम.
श्री
बारीक सारीक गोष्टी सांगणे किंव्हा ऐकत राहणे ह्याने त्रासून न जाणे. बरेच लोक सिद्ध होण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी बारीक सारीक गोष्टी बोलत राहतात. मूळ हेतू काय आहे, हे त्यांना माहीत असतं नाही आणि जे बाहेर येत राहते ते म्हणजे अहं वृत्तीचा परिणाम. ते ऐकून घेतांना आपण होत नाही किंव्हा ठरतं नाही. कश्यावरही आपण ठरतं नाही आणि स्वतःला काय वाटतंय तो निव्वळ त्या क्षणाचा भाव व्यक्त होत असतो - तो माझा नसतो. शिवाय आत - बाहेर प्रक्रिया खूपच गूढ आहे आणि ती चपाट्यावर आणण्याचा ठेका किंव्हा गरज नसतेच. त्याने आपण सिद्ध होत नाही. सत्य ओळखणे आणि सांगणे ह्याला जवाबदारी समजू नका आणि सिद्ध होण्याची गरजही.
सत्य असते. ते फक्त आपण बनतो अनुभवातून. त्यासाठी भगवंताच स्मरण आवश्यक.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home