Friday, November 15, 2024

श्री: गोष्ट होण्याची क्रिया

श्री: गोष्ट होण्याची क्रिया 

भगवंत भाव दृश्यात अवतरतो. ते अवतरतांना अनेक स्तरातून शेवटी तो दृश्यात प्रकट झालेला दिसतो. हे कार्य आणि क्रिया अनंत आहे, तोच त्याचा भाव आहे, शक्ती आहे म्हणून एक पासून ते अनेकपणात हा भाव "प्रकट" होतो किंव्हा जाणवतो. 

जाणीव देखील अस्तीत्व भाव आहे, ज्याच्यातून निर्मिती क्रिया घडतं राहते - त्यालाच जाणीव म्हणतात! 

सांगण्याचे तात्पर्य हे, की ही क्रिया कुणाची मानायची आणि ती कधी पासून आहे हे कुणी सांगावे?!! ज्याला मी माझे मानतो, ते माझे कसे मानू?! मी कोण ठरवणारा आणि अट्टाहास करणारा?! आलेले पदरात असलेले गोष्टी या रूपाचे का, हे विचारून काय मिळेल?! मी कुठून आलो आणि मी हे प्रकरण काय आहे, हे कुणास ठाऊक?! 

तसेच, विषय होणे किंव्हा भासणे हे ही गूढ प्रकरण आहे. कितीही विषय सोडवण्याचा विचार करा, आपण स्वतः अनेक स्तरात गुंतलो असतो, म्हणून विषयही खूप गहन पद्धतीने सामोरे येतो आणि त्याचा उगम, गुण, गती, बदल, रूप - बुद्धीला ठाम ठिकाणा लागू शकतं नाही. मग आपण भीती ही भावना निर्माण करतो. जसे विषय गहन, भीती हा भाव देखील खोल आणि गहन असतो. भीती शांत करणे, म्हणजे विषय शांत होणे म्हणजे मी हा भाव शांत होणे, म्हणजे भगवंत भाव प्रकट होणे.

जर तसे करणे उचित असेल, तर त्याचे मार्ग पदार्पण करणे गरजेचे आहे - ज्यात एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home