श्री : अस्तीत्व
श्री : अस्तीत्व
वेगळेपण भाव आणि एक सत्य हे अस्तित्वाचे दोन गुण आहेत. ह्या पद्धतीने अस्तित्वामुळे गोष्टी असतात, येतात आणि जातात.
अस्तित्व भाव मानणे म्हणजे त्याचे कार्य आणि क्रियाही मानणे - म्हणजेच निर्मिती क्रिया किंव्हा विघटन, गोष्ट, संबंध, वेगळेपण, बदल, हालचाली, अनेक रूपे मानणे. वरील _परिणाम_ अस्तित्वाचा असणारच आणि त्याचा प्रभाव जीवावर होणार. जीव होणे हे ही त्याच क्रियेतून आलेले रूप आहे, मग "मला जग का दिसते" हे त्रासून जाऊन काय अर्थ आहे?! ती दैवी इच्छा आहे, हे पूर्णपणे ओळखणे.
विघटन नैसर्गिक क्रिया मानली, तर त्यातूनच अनेक स्तर, स्थिती, संबंध, रूपे - वृत्ती, विचार, भावना, शरीर आणि त्यांच्यातील वेगळे स्वभाव आणि संबंधही आले! मुळात आपण विखुरले आहोत म्हणून जग भासते. विखुरलेपण जर विलीन झाले तर राहते ते फक्त शुध्द अस्तीत्व. प्रत्येक विखुरलेला घटक त्या पद्धतीचा चक्र निर्माण करतो (corresponding pattern of perception) म्हणून जाणीव त्या पद्धतीने होते!
मी हा भाव जो पर्यंत घट्ट आहे, तो पर्यंत जग आणि त्याचे भोग आले. जेव्हा हा भाव सूक्ष्म होत विलीन होतो, तसे फक्त अस्तीत्व जाणिवेत प्रकट होते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home