Monday, November 18, 2024

श्री : जाणीव

 श्री : जाणीव


विचारांचा प्रवाह आणि शक्तीची क्रिया सतत सुरू असते. त्या क्रियेला अंत नाही, मर्यादा नाही आणि हेतू ही नाही. त्या क्रियेला होण्यासाठी कारणही नाही. जी क्रिया आशिच असते, कार्य करते हेतुरहित त्याला दैवी इच्छा संबोधले आहे. म्हणून असणे आणि होणे - या दोन्ही गोष्टी दैवी स्वरूपाचे आहेत. 

 _होण्यात शक्तीचे दर्शन_ वेगळ्या पद्धतीने घडते आणि परिणाम करते. त्यात अनेक स्तर, स्थिती, चक्र, परिणाम, भोग, अनुभव आकार, गती, गुण, हालचाली या सारे गोष्टी _जाणिवेत_ येत राहतात. ते दर्शन जाणिवेत तेव्हा येते जेव्हा विघटित कियेशी जाणीव समरस होते. म्हणून अनंत हालचाली जाणीव मध्ये अवतरतात किंव्हा निर्माण होतात. 

जशी जाणीव स्थिरावते तसे हे सारे हालचाली मंद होऊन किंव्हा परिणाम न होता, भगवंताचा भाव, म्हणजे शांती रस प्रकट होते. 

म्हणून जाणीवा म्हणजे अस्तीत्व भाव म्हणजेच अस्तीत्व भाव. आपण आहोत, हा भाव अस्तित्वामुळे येतो. म्हणजे ती शक्ती रूप देते आणि जाणीवही घडवते. दुसऱ्या अर्थाने जाणीव असते, म्हणजे शक्ती असते आणि तिचे कार्य असते. मूळ जाणीव भगवंताची आहे - त्यातून क्रियेमुळे जीवाचे जाणीवा होतात. पण सर्व जाणिवांचे मूळ एक भगवंतच आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home