Monday, December 02, 2024

श्री

श्री 

सर्व विश्व, त्यातील स्तर, घटक, स्थिती, चक्र, संबंध, परिणाम, हे एकच सत्य दर्शवते - तो भगवंताचा विलास आहे. ते कळण्यासाठी नामस्मरण करावे लागते. 

गोष्टी आणि आपण आणि त्यातील संबंध हा सर्व अस्तित्वाचा खेळ किंव्हा किमया आहे. भेट, देणे, पाहुणे आणि श्रद्धा आपल्यासाठी महत्वाची बाब आहे जीवन जगण्यासाठी. तरच आपण शुध्द आणि स्थिर होतो आणि भगवंताशी समरस होऊ शकतो. 

भगवंत भेटावा हा भाव मनात संक्रांत व्हायला लागतो, तरच तशी शक्ती हालचाली करते आणि तशे प्रसंग आणते आणि मार्ग प्रकट करते. शक्तीला भाव आहे, म्हणून जशी आपली जाणीव होते, तशी ती कार्य करते. जाणीवच शक्ती चक्र निर्माण करते. 

भगवंत भेटावा म्हणजे त्याचे गुण खरे वाटणे, पलीकडे होणे, मर्यादित न होणे,  परावलंबन स्वीकारणे, हेतू ची मर्यादा ओळखणे, प्रवाहाची जाणं येणे, अट्टाहास सोडणे, सूक्ष्म हऊ पाहणे, आनंदी सदा सर्व काळ राहणे, सिद्ध करण्याचा खटाटोप सोडणे वगैरे...

त्यासाठी, स्वतःसाठी अभ्यास करावा. कृपा कधी प्रकट होईल ते भगवंत जाणिवेत आणेलच. 

बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की भगवंत आणि प्रपंच्यामध्ये तालमेल कसा साधायचा? तर तसे न विचार करणे. कारण हा प्रश्न विचारातून उद्भवतो, ज्याला उत्तर शोधण्याचा मर्यादा आहेत आणि त्याचे परिणाम आहेत. भगवंत - ही वस्तुस्थिती श्रद्धेने उमगते. श्रद्धा प्रपंच्यामध्ये निर्माण करत पलीकडे आपल्याला नेते. विचाराने पलीकडे होता येते नाही. श्रद्धेने होऊ शकते, कारण भगवंताचा तो पूर्ण, शुध्द, सत्य गुण आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home