श्री
श्री
भाव किंव्हा जाणिवेच अस्तीत्व असतं, म्हणजे चक्र, परिणाम, निर्मिती, क्रिया असते. त्या क्रियेतून संबंध भावना तैय्यार होत राहतात. मूळ शक्ती भगवंताची - तिच शुध्द शक्ती आणि सूक्ष्म जाणीव आहे जीच्यातून अनंत विश्व भाव निर्मितीला येत राहतात आणि बदलत राहतात - असे दिसून येते जाणिवेत. खरे पाहिले तर हे प्रकरण लाटांच्या ओहोटी आणि भरती प्रमाणे आहे किंव्हा श्वास घेणे आणि सोडण्या प्रमाणे आहे. सुरुवात असते का? आणि शेवट? ज्या वस्तूला सुरुवात आणि शेवट नाही - त्या संकल्पनेच्या पलीकडे आहे, ती कायमच आहे. त्यातून आलेले सर्व रुपयांना सुरुवात आणि शेवट आहे किंव्हा _तत्पुर्तेपणा_ आहे. म्हणून त्याच भाषेच्या माध्यमातून पलीकडे होणे हा मार्ग आहे.
तसे प्रयत्न करतांना अनेक स्थितिंना आणि आकारांना सामोरे जाणे आहे. अस्तित्व कुठलीही परिस्थिती निर्माण करू शकते आणि म्हणून "हे का होत आहे" असे विचारणे बरोबर ठरतं नाही.
दुसरी गोष्ट ही की सर्व गोष्टींमध्ये फरक भासणार. ते सपाट करण्याचा अट्टाहास करू नये. समरसता वेगळ्या आकाराशी किंव्हा रुपाशी होऊ शकते, पण त्यातून तत्पूर्तेपणही राहतो. म्हणून समरसता भगवंताशी साधणे.
भगवंत प्रकट होतच राहतो. The principles of existence always manifest as hierarchies, scales, transitions, cycles, changes and so on and those help to build connections and relations.
हे जर ध्यानात घेतले तर "मी" ही भगवंताशी जोडला जाऊ शकतो. मग श्रद्धा का वाढवू नये?
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home