श्री
श्री
बुद्धीचे कार्य जरी विघटन करणे असले आणि वेगळेपणाचा भाव देत असले तरीही शांती संबंध आपण प्रकट करू शकतो. ते असे, की आपण बुद्धीच्या कार्यावर अवलंबून असता कामा नये. म्हणजे ते जे दाखवेल किंव्हा अर्थ निर्माण करेल ते पूर्ण सत्य असायला हवे किंव्हा पूर्ण सत्य त्यावर आधारलेले हवे असे मानू नये. कितीतरी गोष्टींचे होणे हे बुद्धीच्या पलीकडील क्रिया करून आणते, तर ते बुद्धीच्या भाषेत कसे कळून येईल?!
दुसरी गोष्ट अशी की विघटन काहीही होऊ दे, अनेकपणा आणि त्याच्यातून आलेले संबंध कितीही प्रकारचे रूप घेऊ दे, ते "सर्व" गोष्टी (दृश्यात आणि आदृश्यात असलेले) एकाच पूर्णत्वाचे घटक आहेत. वेगळे होणे किंव्हा दिसणे ही संकल्पना आहे किंव्हा स्थिती आहे. त्यातून "भीती" हा भाव का उमटवू देणे?! निर्णय, समज, जाणीव आपली आहे....वेगळेपण दिसले तरी ते एकाच शांती स्थितीचे रूप आहेत हे ही ध्यानात ठेवणे.
आता आपण भीती ह्या भावने बद्दल जरा बोलू. हा भाव - _भावनेच्या_ भाषेत जाणून घेतला तर कदाचित तो स्वीकारला जाईल. बुद्धी भीतीला मिटून टाकण्याचं अट्टाहास धरेल - त्याने ते काही साध्य होणार नाही. भीती - या भावनेला नैसर्गिक बाब मानली पाहिजे, जिच्यामुळे आपण भगवंताच्या दारी पोहोचू शकतो. म्हणजे भीती सोडवू नका. भीती बरोबर आपुलकी असते, शोध असतो सत्याचा, परावलंबन भावना असते, जे कळू शकत नाही त्याची प्रचिती असते, आपण कुठून आलो, का आलो, कुठे जाणार आहोत, त्याची विचारपूस असते. जे अनंत आहे, चिकित्सा न करता, ज्याला कारण न लागता स्वीकारावी लागते, हे शिकवण असते. ज्याला शांतपणे बघून स्थिर व्हायचे असते, ती आहे भीती! म्हणजे भीती एकटी येत नाही - तिच्या बरोबर अनेक गूढ, हळूवार, अदृश्य भावना असतात. हे सर्व भीती स्वीकारायला भाग पाडते!
म्हणून भीतीला आपलेसे माना . त्याच्यातून स्थिरता येणार आहे.
हरि ओम.
श्री
विघटन झाले की गती आणि संबंध आले. त्याचा भावनेत होणारा परिणाम म्हणजे "हाव" किंव्हा अतृप्त भावना. म्हणून आपण आणखी चिकित्सक होतो, आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणखीन धावपळ करतो, आणखीन मागून घेतो, आणखीन चंचल राहतो, आणखीन साठवून घेतो, आणखीन नाकारतो, आणखीन पळ काढतो, आणखीन इंद्रियांच्या आहारी जातो....तरीही आपली भूक काही तृप्त होत नाही!
त्याचा एकमेव पर्याय म्हणजे अहं वृत्ती विलीन करणे.
गोष्टी वेगळे शेवट पर्यंत वाटतच राहणार आहेत. त्याला नजरेआड किंव्हा पुसून टाकण्याचा अट्टाहास करू नका. आपण स्वतः मध्ये खोल जाऊन सुद्धा वेगळेपणाचा संबंध बदलत जाणार आहे - त्यातून सुखाचे आणि दुःखाचे आणखीन गूढ रहस्य उमगणार आहे. याचा अर्थ मार्ग चुकला असे होत नाही. हेच कळायचे आहे की खोल जाऊन सुद्धा किती सूक्ष्म पातळीवर शक्तीची क्रिया होत असते आणि जाणीवावर परिणाम करत असते. तरीही ते सातत्याने क्रिया करत राहायला लागते. त्याला तपश्चर्या म्हणतात.
श्रद्धा ठेवा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home