Monday, November 25, 2024

श्री

 श्री 


अहं भाव किंव्हा ज्याला "मी" संबोधित होतो तो खूप खोलवरून प्रकट होत असतो म्हणून त्यात अनेक स्तर, स्थिती, क्रिया, चक्र, गुंतागुंती, परिणाम, अनुभव आणि स्मरण असतं. त्याने अनेक आकार दिसून येतात, वेगळेपणा भासतो, बदल जाणवतात, गती दिसते, संबंध दृष्यासी निर्माण होतात आणि कार्य करतात. ही एक प्रकारची अस्तीत्व शक्ती आहे.

म्हणून खोल म्हणजे किती खोल, त्यासाठी श्रद्धेचा भाव पत्करून स्वतः मध्ये परिवर्तन करायला लागते. प्रत्येक स्तरात भावाचे रूपांतर होणे आवश्यक असते; प्रत्येक स्तरात "मी" किंव्हा वेगळेपणा आणि संबंधांची व्याख्या असते; प्रत्येक स्तरात दृश्याचा भाव आणि आकार जाणवत राहतो. त्या टप्प्यांना श्री ज्ञानदेव "लोक" असे म्हणतात. असे सात स्तर आहेत. ते ओलांडून भगवतस्वरूप होण्याची क्रिया आहे. म्हणजे प्रत्येक स्तरातील संबंध (आणि त्यावरून स्मरण किंव्हा संकल्पना किंव्हा मुळातील होणारे स्पंदने) बदलत जातील. तो _अभ्यास_ आहे - कष्टी होण्याचा अट्टाहास नाही. अभ्यासाला शुध्द हेतूची गरज आहे. 

म्हणून संबंध गूढ असतात आणि आपल्या बरोबर चालून आलेले असतात. त्या संबंधाच्या मुळे रूप निर्माण होणे, वावरणे आणि विलीन होणे हे चालू राहते. तो शक्तीचा परिणाम आहे - अस्तीत्व आणि त्याचे कार्य आणि त्याचा भाव समजून घेण्याचे स्तर. 

या वरील प्रक्रियेला _अंतर्मुख होणे_ असे म्हणतात. 

हरि ओम.



श्री 

संबंध अस्तित्वाचे असतात. आपण अस्तित्वात असतो, म्हणून संबंध "निर्माण" करतो इतर अकारण बरोबर. एकाच वेळेला विघटन होण्यामुळे क्रिया, कार्य, स्तर, बदल, वेगळेपण, स्मरण, अनुभव, आकार आणि *संबंध* तैय्यार होऊ पाहतात. 

म्हणजे संबंधांचे होणे, वावरणे आणि त्या प्रमाणे गोष्टी *सामोरे* येणे आणि बदलणे हे शांतपणे स्वीकारावे. काहीतरी दैवी प्रबोधन आहे, ज्याच्या मुळे गोष्टी घडतात, हालचाली होतात, बदल होतात आणि संबंध त्यांच्या बरोबर निर्माण होतात. 

आत खूप खोल क्रियांमुळे, जी दैवी इच्छा आहे, आपण होतो आणि परिस्थिती मधले घटक आणि विस्तार ओढून घेत राहतो आणि प्रतिक्रिया देतो - चक्र. या सर्व घडामोडींना सूक्ष्म रुपात गेलो तर हेतू नसतो - निर्मिती होत राहते. हेतू नसणे म्हणजे कुठलीही वृत्ती, कार्य, आकार घडण्याची गरज न राहणे - म्हणजे शांत भाव होणे. 

आपली नजर ज्या वृत्तीवर असते, त्या प्रमाणे घडामोडी निर्माण होतात, संबंध जोडले जातात आणि अनुभव येत राहतात - चक्र. म्हणून अस्तित्वात पूर्णत्व आकारात नसते किंव्हा वृत्तीतही नाही. पूर्णत्व आत अनुभवायला लागते, बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देऊन नाही, कारण त्या बदलत राहतात आणि त्या स्वतः खूप खोलवरून आलेल्या असतात. स्वतःची चिंता करू नये - दुसऱ्यांना आपण वेडे आहोत, घाबरट आहोत, त्रासिक आहोत, बावळट आहोत - ह्या उद्गरांना आणि शब्दांना काहीही मोल नाही, कारण त्यांच्या समजुती अपूर्ण असतात. आणि त्या समजुती पाडण्यासाठी आपण काहीतरी सिद्ध करणे हे ही गरजेचे नाही. कारण सारे खेळ तो जाणिवेचा आहे - देह बुद्धी आपल्याला गुंतून ठेवते आणि कष्टी करते. फक्त आत्मज्ञान शांत भाव *प्रकट* करते. 

स्थळ, काळ, बदल ह्यांची चिंता असू नये. आपण इथेच आहोत. भगवंताची कृपा असतेच. मला स्वतः कधी कधी गोष्टींचा प्रचंड त्रास होत असतो, पण वरील विचार मनात येऊ दिले की या सर्व अनुभवांचे प्रबोधन भगवंताने केले असेल असे मी समजून घेतो आणि कर्तव्य करत राहतो. कदाचित आणखीन शुध्द होण्याचा मार्ग असावा; आणखीन देण्याचे प्रबोधन असेल; आणखीन देणे लागू असेल; आणखीन सत्याच्या जवळ होण्याची भगवंताची इच्छा असेल....

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home