श्री
श्री
विघटित स्थिती हे शक्तीचे कार्य होऊन त्या कार्याची जाणिव देखील मर्यादित रूप घेते - त्या रुपाचा _भाव_ म्हणजे "मी". शक्ती तशीच नसते, तिला स्वतःची जाणिव असल्यामुळे एक प्रकारचा भाव ती घेऊन येते किंव्हा निर्माण करते किंव्हा प्रकट करते किंव्हा प्रज्वलित ठेवते. त्या भावामुळे आपल्या स्मरणात किंव्हा जाणिवेत हालचाली दिसून येतात आणि अनेक रूप, वृत्ती, आकार, संबंध, बदल अनुभवले जातात. त्याला आपण घाबरतो कारण ही क्रिया आणि जाणीव कशी घडते हे आपल्या बुद्धीला पूर्णपणे कळत नाही. आपण कुठून आलो, कुठे जाणार आहोत आणि सगळ्या गोष्टी भलत्याच वेगळे होत राहतात ह्याने आपण बेचैन होतो. हे शक्तीचे स्वतः बद्दल विचार करणे आहे. मूळ शक्ती *भगवंत* स्वतः आहे - त्यातून शक्तीचे अनेक रूप निर्माण होतात आणि त्याला "मी" असे मानतो.
म्हणून जर या क्रियेतून मी निराळा झालो किंव्हा स्वच्छपणे क्रियेला क्रियाच ओळखली तर शांती भाव प्रकट होतो.
बुद्धीचे गुण आहेत. पण बुद्धी पेक्षा जाणीव अधिक सूक्ष्म म्हणून तिचा अभ्यास करणे आहे. बुद्धीने कोडी सुटत नाहीत. उलट गुंता अधिक वाढण्याचा संभावना असते. बुद्धीचे गुण तसेच गुण अस्तित्वतून घेते - तर अस्तीत्व तसेच दिसून येणार. ज्या गुणांना आपण चिकटून राहतो त्यातून अस्तित्वाची संकल्पना आपल्या ध्यानी प्रकट होते - इतकं प्रकरण विस्तारलेले आहे. म्हणजे आत आणि बाहेर आणि सर्व स्थितीत त्याच गुणांची भाषा वावरत राहते.
असो, तात्पर्य हे की भक्तीचे गुण सर्व ठिकाणी वावरले तर सर्व ठिकाणी शांती भाव जाणवू शकेल. म्हणून अंतर्मुख झालो तर सारे विश्व अंतर्मुख क्रियेतून दिसून येईल.
शेवटची गोष्ट ही की भीती खूप सूक्ष्म रूपातून आली असते. तिला टाळता येत नाही किंव्हा डावळू शकत नाही. ती नैसर्गिक आहे. त्या भावनेचा स्वीकार करतच ती नमवायला लागते. त्यासाठी भगवंताची कृपा मागायला लागते - की कुठलेही विषय नको - समाधान हवे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home