श्री
श्री
भोग संकल्पना मानवाने निर्माण केली आहे. भोग याला प्रसाद असे ही संबोधित आपण करू शकतो. आणि तसे मानले तर आपण शांत होऊ.
अस्तित्व जाणीव हे काय आहे, हे नीटसे लोकांना किंव्हा कुठल्याही आकाराला उमगलेले नाही. ते कळले नाही म्हणूनच तो आकार तिथे आहे आणि आपल्याही जाणिवेत त्या आकराशी संबंध येत राहतात. संबंध क्रियेतून होतो - किंव्हा अस्तित्वाच्या गुण धर्मातून.
स्वतः शक्ती विघटित होऊन आकार _निर्माण_ करते (संकल्पना) आणि त्यात गुंतून राहते. विघटित होऊ पाहताना संबंध निर्माण करते आणि सर्व स्थिती प्रकट करते. त्या स्थितीच्या द्वारे शक्ती _कार्य_ करते असे आहे. _विघटन होणे आणि संबंधित राहणे आणि वेगळेपण भासणे हे आहे शक्तीचे कार्य_ . ते सगळ्यांना पेल्वायला लागणार आहे! त्या क्रियेत आपण आलो आहोत, तर तसे ओळखावे.
बाकी सर्व भगवंत असतोच हात पुढे करायला.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home