श्री
श्री
दृश्य जग निर्मिती क्रिया दर्शवणार आणि भगवंताचे कार्य किंव्हा अस्तीत्व जाणिवेत आणणार. आपण किंव्हा आपलं मन किंव्हा मानवी जाणीव भगवंताच्या अस्तित्वाला _शक्ती रूपाने_ अनुभवते. तीच शक्ती अशी असते की त्यात विघटित क्रिया होण्याची संभावना असते म्हणून सूक्ष्म स्तरापासून ते स्थूल स्तरापर्यंत आणि तसे _भाव_ (awareness) निर्माण करत ती स्मरण शक्ती निर्माण करते आणि अनुभव जाणिवेत आणते साखळी आणि संबंधांच्या पद्धतीने.
सध्या जाणीव अशी आहे की त्यात भाव असतो, म्हणून संबंध निर्माण होतात. _संबंधाचे_ कार्य, या शब्दाचा फोड केला, तर त्यात _क्रिया_ दिसून येईल. जाणीवेच्या शक्ती मुळे क्रिया त्या पद्धतीची होते आणि त्यातून अनेक आकार भासत राहतात - ते निर्माण होतात, वावरत राहतात आणि निघून जातात. हे असणार. हे आपले अस्तीत्व आहे. हे आपले अनुभव आहे. हे आपण आहोत. हेच आहे _अस्तित्वात_ असणे.
म्हणजे आपण _इथेच_ असतो, आणि परिस्थिती बदलत राहण्याची जाणीव होत राहते. बदल घडणे हे बाहेरील कवच समजावे जाणीवेचे आणि स्थिर होणे ही आतील स्थिती समजावी. आतून ते बाहेर निर्मिती क्रिया वाटतं राहते. आपण हे दोन पणाने त्याकडे बघतो सध्या. त्यातून सुरुवात मानून दोन्ही रूप _एकाच_ सत्याचे आहेत, हे ओळखावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home