श्री: भेट
श्री: भेट
भेट हा भाव आहे. म्हणजे कुणीतरी भेटायला येते, थोडे काळ राहते, संबंध येतात आणि ती व्यक्ती निघून जाते. हे माहीत असते की काही काळ ती व्यक्ती असणार आहे आणि जाणार आहे. आणि काही ना काहीतरी येत राहणार आहे आणि जात राहणार आहे. त्यातून हे दिसून येईल की येणे आणि जाणे हे होत राहते. त्याकडे कसे बघावे आणि संबंध कसे निर्माण करावे हे आपल्यावर आहे. अपेक्षा कुठल्याही हालचालीवर ठेवली नाही, तर येणे आणि जण्यानी आपली शांती बिघडणार नाही.
तसेच आपल्या आतही विचारांचे निर्माण होणे क्रिया चालू असते - येणे आणि जाणे असते. थोडक्यात निर्मिती क्रियाकडे "भेट" म्हणून बघितले तर मन समाधानात राहील. कारण मन हे विचार नाही, शक्ती आहे अस्तित्वाचे - हा अनुभव घ्यायला हवा. त्या मनात अनेक वृत्ती येऊ पाहतात आणि निघून जातात - आणि ही साखळी राहतेच. त्या साखळीने स्वतःचा अहं भाव किंव्हा वेगळेपणा निर्माण होतो आणि त्यामुळे हालचालींना आपण त्रासून जातो. स्वस्थता वाटतं नाही.
आपल्याला स्मरण भगवंताचे करायचे आहे - म्हणजेच तो गोष्टी भेटीस आणतो. ते आपल्या जाणिवेत येत राहतात आणि ते निघूनही जातात त्याच्याकडे. म्हणजे त्याची आणि आपली देवाण घेवाण होऊ पाहते. भगवंत हे चक्राचे कारण आहे, हे मान्य करणे.
तसेच आपण दृश्यात आलो पाहुणे प्रमाणे आणि निघूनही जाणार आहोत हे ध्यानात ठेवणे. म्हणजे दृश्य भावही पाहुणे प्रमाणे बघणे आणि आपणही पाहुणे आहोत भगवंताच्या घरी हे जाणून घेणे. कायम आहे तो भगवत भाव, इतर गोष्टींचे होणे हे पाहुणे प्रमाणे वावरणे आहे - आपली ही तीच गत आहे.
दुसरी गोष्ट ही की कुठले विचार मनात घोळत राहतात, त्याने त्रासून न जाणे. त्यातूनच येणे आणि जाऊ देणे हा भाव आपण आत्मसात करणार आहोत. त्याला पूर्ण होणे म्हणतात. सारे स्तर, घटक, हालचाली, वेगळेपणाचा भाव, आतील क्रियांचे परिणाम, बाहेरील वेगवेगळ्या वस्तू हे *पूर्ण* मानणे - म्हणजे एकाच सत्य भावातून आले आहेत हे ओळखणे आणि आपुलकीने स्वीकारणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home