Monday, December 02, 2024

श्री

 श्री 


बुद्धी कुठलीही स्थिती सरळ रेगे सारखी दाखवते. Causality is nothing but a linear way (or a limited way) of looking at  creation. 

ती एक पद्धत झाली. संबंध एका प्रकारे सरळ रेगे सारखे जीवाला वाटू शकतात. म्हणजे चंचल असणे, बेचैन वाटणे, तात्पुरते वाटणे, चक्रात गुंतून राहणे, अर्धवट वावरणे, अहं वृत्तीमुळे कृती करणे - हे सर्व घडामोडी "सरळ रेग" दर्शवते. किंबहुना दृश्य जग हे सरळ रेगे सारखे भासते, म्हणून त्या प्रमाणे जीव प्रतिक्रिया देतो. पण त्याने आत्म्याचा विकास कसा होणार, किंव्हा त्यातून आत्म्याच्या शक्तीची प्रचिती कशी होणार?!

थोडक्यात आत्माचे *दर्शन* होणे ही सरळ रेगेची बाब नाही. ती शक्ती खूप सूक्ष्म आणि गूढ आहे, म्हणून रेगेच्या भाषेत किंव्हा स्वभावात बसत नाही! अभ्यास जो आहे तो या गूढ स्थितीचा आहे, जो अस्तित्वाचा केंद्र स्थान आहे. 

दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाले तर त्याचा अभ्यास श्रद्धा वाधवण्याने होतो, बुद्धीने नाही. श्रद्धेचा गुण धर्म स्वीकारण्याचा आहे आणि शांत होण्याचा, सूक्ष्म होण्याचा, विशाल होण्याचा, स्थिर होण्याचा, पूर्ण होण्याचा. नामस्मरणाने ते जोपासावे. 

तिसऱ्या पद्धतीने सांगायचे की जीवनाची स्थिती अशी का आहे, त्याने व्याकूळ होण्याची गरज नाही. गोष्टींचे होणे, आकर्षिले जाणे, वावरणे, क्रियेत राहणे, घडामोडी होणे, संबंधित राहणे, गतिमान राहणे, गुण धारण करणे - हे गूढ आहे, सरळ नाही. त्याला न कुरकुर करता स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल. गोष्टी योग्यच होतात, हे ध्यानात राहू देणे. अनंत आकार, वेगळेपण, अनंत चक्र - त्यांनी शांत असणे. अर्थ नाही कळले, तरी शांत राहणे. घडामोडी अशे रूप घेऊन का आले, हे जरी कळले नाही, तरी शांत राहणे. कारण जे येणार, ते निघूनही जाणार. हे होणार, ते बदलणार देखील. जे वावरणार ते विलीन होणार. जे गुणात येणार, ते गुणातीत होणार. जे गुणातीत असणार, ते गुण धारण करणार. 

चौथीत बाब अशी की "मी" हा भाव मर्यादित आहे. त्याचा उगम गूढ आहे, ग्राह्य नाही. उगम आहे म्हणून बदल आहे आणि मावळणे आहे. हे असले, तरी शांत राहणे. शांत राहणे म्हणजे अस्तित्वाच्या शक्तीचे भान सतत जागृत राहू देणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home