Friday, December 06, 2024

श्री

 श्री 


वेगळेपणामुळे धडपडत राहण्याची वृत्ती असते. वृत्तीला शांत किंव्हा पूर्ण भाव देणे महत्वाचे आहे. वृत्तीचा स्वभाव, किंव्हा कुठल्याही रूपाचा स्वभाव परावलंबी असणे, संबंधित राहणे, बदलणे असा असतो, म्हणून त्यातून निर्मिती होत राहते, आकार येत राहतात आणि त्यांचे परिणाम होत राहतात मनावर. वृत्तीच्या प्रभावाखाली राहिलो, तर त्यातून खूप गोष्टी जतन कराव्या, साठवून ठेवाव्यात, मिळवाव्या असे काहीसे कृत्य आपण करत राहतो. खूप सत्ता मिळाली किंव्हा सुख देणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर कायमचे सुख मिळेल अशी कल्पना आपण करतो - पण ते सर्व नाशवंत असते, बदलणारे असते. याचाच अर्थ की समजूत खोटी होती आणि खरे कार्य भगवंताच्या शक्तीचे होते, आपले नाही! जगात सर्व गोष्टी गुंतलेल्या आहेत आणि बदलणाऱ्या आहेत आणि अस्थिर आहेत - तसेच आपले रूप आहे आणि विचारांची दिशा आहे. म्हणून अपूर्ण वाटणे ही मनाची धारणा आहे, सत्य नाही. 

त्यातून मग पूर्ण भाव होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक. त्यासाठी श्रद्धा. श्रद्धेने शांती रस प्रकट होईल.  शांतितून प्रतिभावंत विचार येऊ पाहतात, जे मर्यादित असतं नाही. काळजी नसावी. दृश्याचा संबंध विचारांनी भगवंता पर्यंत पूर्ण नाही नेऊ शकतं. म्हणून कृपा लागते. सरळ काहीच नाही, त्वरित काहीच नाही, जे दिसते तसे त्याचा अर्थ लावण्याची धडपड असू नये. काहीही करण्याची धडपड असू नये. 

संबंध युगानुयुगे असतात गोष्टींशी. म्हणून शुध्द होणे ही गूढ क्रिया आहे जिला खूप काळ लागू शकतो. सैय्यम ठेवा. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home