श्री
श्री
कुठल्याही अस्तित्वाच्या क्रियेला शुध्द हेतू असतो. तो कळण्यास आपल्यालाही शुध्द होणे गरजेचे आहे. आपण स्वतः एका हेतूमुळे रूप धारण केले आहे आणि त्या प्रमाणे संबंध निर्माण करतो, चक्र निर्माण करतो, दृष्यशि संबंध ठेवतो आणि नाती जोडतो आणि अर्थात ह्या क्रियेचे परिणाम भोगतो. त्याला आपण भाव म्हणू शकतो आणि साखळी होणे असे ही म्हणू शकतो. म्हणजे बाहेरील संबंध किंव्हा आकार हे आतल्या स्थितीवरून प्रकट होतात. बाहेरचे दृश्य खरे नाही - त्याला गुंतून ठेवणारी डोर म्हणजे आतील भाव किंव्हा हेतू.
हेतू खूप सूक्ष्म आणि प्रभावी ठरते. वास्तुकलेत हेतू दाखवण्याचे काही प्रयोजन पाहिजे, जिथून इतर सर्व काही रूपरेषा आखता येऊ शकेल. म्हणजे हेतू ही जाणीव व्हायला हवी आणि ती सूक्ष्म भूमिकेतून येते, हे ध्यानात यायला हवे. तिथून हेतुला आकार कसे द्यावे, हे शोधावे आणि नंतर ते योग्य पद्धतीने वास्तू मध्ये कसे घडवावे हे बघावे. प्रत्येक वेळेला किंव्हा घटकांमध्ये आकार बदलेल, पण मुळातील हेतू तोच राहतो.
तसेच प्रत्येक वेळेला परिस्थिती, माणसे, देह, रूप बदलेल, पण आतील हेतू (कारण) तेच राहते. म्हणून आतील हेतू कसा घडतो आणि कुठून घडतो, हे बघावे.
हेतुला शुध्द कसे करावे, हे बघावे. त्या शुध्द होण्याच्या प्रक्रियेत भगवंत भाव प्रकट होतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home