श्री
श्री
कुठलाही क्षण किंव्हा आकार किंव्हा संबंध किंव्हा नातं किंव्हा कार्य हे जाणिवेतून अनुभवू शकतो. हेतू जाणिवेतून घडतो. म्हणून जाणीव जितकी व्यापक, सूक्ष्म आणि प्रेमळ, तितका हेतू निःस्वार्थी आणि दृश्याचा परिणाम मनावर कमी उठतो, किंव्हा दृश्य - वस्तू आपली जाणीव भगवंताची छटा मानू लागते, ओळखू लागते. थोडक्यात आपण कायम स्वस्थ राहतो.
काहींच्या बाबतीत हे उपजतच असते. काहींना योग्य मार्ग चालायला लागतो, जेणेकरून स्वतःचे अंतःकरण शुध्द होत जाते. मार्ग म्हणजे भगवंताचे स्मरण सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यावरून आपले कर्तेपण शून्य टक्क्यांवर असते हे ओळखणे. सर्व कर्तेपण भगवंताच्या इच्छेने होते हे ओळखणे. जो काही भाव आहे, जी काही परिस्थिती, जे काही वेगळेपण आणि विचार चक्र येऊ पाहतात, ते भगवंताच्या अस्तित्वामुळे आकार घेऊन आहे, हे ओळखावे. ह्याचाच अर्थ की बुद्धीच्या पलीकडे जाणीव सूक्ष्म करणे, किंव्हा बुद्धी शांत होऊ देणे, किंव्हा बुद्धीच्या चशमानी सर्व गोष्टींचा अर्थ न लावणे, किंव्हा स्वतःला दृष्यावरुन लेखू नये.
बुद्धी म्हणजे स्वतः एका जाणीवेच्या स्थितीतून उद्भवते. म्हणजे बुद्धीच्या स्वभावाला हेतू असतो. त्यावरून वेगळेपण, बेचैनी, चक्र, बदल, परावलंबन, स्वार्थीपणा, आणि इतर भावना त्या बरोबर _साखळी_ सारखे प्रकट होत राहतात.
म्हणून बुद्धीला शांत करणे हे महत्वाचे कार्य आहे, जेणेकरून नंतरची (संबंधित असलेली) साखळी होण्याचा प्रश्नच उरत नाही!
किचकट आणि विखुरलेले संबंध समजून घेण्याची जरुरी नाही आणि त्याकडे लक्षही देऊ नये आणि बोलूनही दाखवू नये. Do not bother about fragmentation - as a dimension of thoughts. चिंता किंव्हा त्रास - हे ही साखळीच आहे, ज्यावरून आपण शांत होत नाही आणि ते घालवण्यासाठी मार्ग बुद्धीच्या भाषेत होऊ शकत नाही.
त्यासाठी भगवंताचे चिंतन करणे हा एकच मार्ग आहे. अस्तित्वाचे स्वरूप जाणण्यासाठी भगवंत म्हणजे काय आणि त्यात मी कोण असतो, हा संबंध ओळखणे गरजेचे ठरते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home