श्री
श्री
विचारांचा, साखळीचा, वासनेचा उगम माहीत नाही आणि म्हणून भगवंताची जरुरी आहे, तो भाव प्रकट होण्याची गरज आहे. उगम क्रिया तो असल्यामुळे होते, असे संत सांगतात, त्यांचा तसा अनुभव आहे. म्हणून त्यांना सगळीकडे भगवंताची शक्ती कार्य करत असण्याची प्रचिती येते, आपल्याला मात्र दृश्य जग जड दिसते! हा जाणिवेचा फरक आहे.
म्हणून भगवतस्वरुपाचे चिंतन करत राहणे आले आपल्यासाठी. त्याचा परिणाम असा होतो की विचार येतात आणि जातात, पण प्रतिक्रिया देणे किंव्हा त्यातून साखळी निर्माण करण्याची इच्छा आपण करत नाही. कालांतराने कदाचित विचारही उद्भवत नाही. ती स्थिती दिव्य समजावी आणि तिथे शांती स्थित असते.
कुठल्याही गोष्टीचा, स्थळाचा, काळाचा, कार्याचा परिणाम स्वतःवर होऊ न देणे (सूक्ष्म होणे) म्हणजे भगवत भाव.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home