Tuesday, February 25, 2025

श्री

 

श्री 

 अस्थिर असणे हा मानवी स्वभाव आहे - pattern of creation. त्यातून बऱ्याच संकल्पना येत राहतात, संबंध निर्माण होतात आणि भाव होतो. एक विशिष्ठ प्रकारच चक्र किंव्हा कृती होते, जिचे बीज अदृश्यातून निर्माण होत राहते. त्याचे घटक वासना, वृत्ती, विचार, भावना आणि आकार असे आपण म्हणू. प्रत्येक घटकेचा स्वभाव आहे जो अस्तित्वाचा एक रंग दाखवतो. रंग कसा आहे किंव्हा भाव कसा आहे, त्यावरून वेगळेपण आणि तात्पुरतेपण वावरत राहते. म्हणजे काही रंग इतरांच्या पोटातून निघतात किंवा गाभाऱ्यात असतात (किंव्हा सूक्ष्म असतात). सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे कार्य वर वरचे ओळखता येत नाही. त्या स्थितीत गेल्यावर कार्याची व्याख्या दिसून येते. 

 अहं वृत्ती हा एक रंग आहे. त्याच्या गाभाऱ्यात कैक सूक्ष्म वृत्ती आहेत. आणि त्यांच्याही आधी फक्त शांती भाव आहे. आपल्या रंगाला बाहेरची खेच आहे. प्रवास जो आहे तो उलट करण्याचा आहे किंव्हा सूक्ष्म होण्याचा आहे. त्यातून सूक्ष्म रंग दिसून येतील आणि शेवटी त्यांच्याही पलीकडे राहणारी किंवा वावरणारी शुद्ध स्थिती.

 क्षण अशा साऱ्या स्थितीतून येत राहतो. म्हणून आपली स्थिती होते. क्षण हा स्वभाव आहे, त्यातून कार्य अपेक्षित आहे. कार्य करावे आणि शांत बसावे. कार्य करण्याचा हेतू भगवंताला धरून राहिला तर शांत राहू. म्हणजे कार्य भगवत उद्भवत आहे.

 हरि ओम.

 

 श्री 

 अस्तित्व ही सगळ्यात महत्वाची क्रिया आहे. माझ्या मते, ते एक विशाल चक्र आहे ज्याला उपमा म्हणून स्टार, स्थिती, घटक, क्रिया, भाव, असे काहीसे शब्द लावतात. त्याचा सर्वांगीण परिणाम म्हणजे *अनुभव* प्रकट होत राहणे, ज्याला "मी" असा शब्द प्रयोग करतो. 

 अस्तित्व असतेच आणि त्याचा परिणाम असतोच, ज्याला पदार्थ घडवत राहणे, वावरत राहणे आणि विलीन होणे असा आहे. Existence is a *continuous* tense - unfolding and changing and connected to everything or any aspect of creation.

 ह्याचा सरळ अर्थ असा की जीवाच्या हाताच्या पलीकडे गोष्टींचे तत्व, मूळ, घडवणूक, संबंध होत राहतात.  ते दैवी उद्भवत राहतात, म्हणून राग करून उपयोगाचे नाही. 

 तसंच, सैय्यम तो हवा, कारण अस्तित्व बौद्धिक अर्थाच्या पलीकडे असते आणि परिणाम करते. मन एखाद्या गोष्टीला का धरून ठेवते किंव्हा ध्यानात आणते, ते भगवंतावर सर्व सोडणे - कदाचित त्यात त्याची इच्छा असेल, असे ओळखणे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण होतो, वावरतो, जातो - हे सर्व स्वीकारावे. आपण कुठल्या प्रमाणे प्रक्रिया करतो किंवा विचार आणतो, हे भावाचे रूप दर्शवते. त्या भावनेला मन धरून ठेवतो आणि तसे अनुभव प्रकट करत राहतो. प्रक्रिया देणे हे हेतूचे, संबंधांचे, साखळीचे रूप दर्शवते. 

 ती एक _स्थिती_ आहे. ते सत्य नाही, किंव्हा सत्य ओळखणे हे खूप सूक्ष्म, अदृश्य आणि प्रकट रूपाच्या गूढ अवस्थेतील कार्य आहे. तसे आपले मन झाले किंव्हा भाव साकारला गेला, तर आपली प्रक्रिया वेगळ्या पातळीवर होऊ शकते. 

 थोडक्यात, विचार, भावना, आकार - ह्यांना शक्तीचे स्वरूप असे बघायला हवे. ते स्वरूप म्हणजे, ज्याला मी असे मानतो, ती एक स्थिती असते वावरण्याची. त्या स्थितीला, दृश्यात येणाऱ्या, गुंतण्याला अशी बौद्धिक सुरुवात अशी नसते. ती सुरुवात सूक्ष्म इच्छेतून घडते, म्हणून ती बुद्धीच्या पलीकडे मानावी. 

 ती पलीकडे असेल, तर बुद्धी ही एक साखळीतील प्रकट होऊ पाहणारी क्रिया आहे, ज्यात मन गुंतून राहते. म्हणून त्या क्रियेला शांतीचा रंग देणे आवश्यक आहे.

 त्यासाठी नामस्मरण.

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home