श्री
श्री
बदल आपल्या आत ही घडत असतो. जे सर्व दृश्यात आहे, त्याचे बीज आपल्या आत ही आहे, ज्याला वासना किंव्हा वृत्ती म्हणतात. दृश्य भोगण्याचे कारणच ते आहे जे आपण बीज प्रकट करत राहतो किंव्हा त्या क्रियाशी समरस असतो. त्यात परिवर्तन होत विचार, भावना आणि आकार असा काहीसा क्रम निर्माण होतो जो इतर गोष्टींमध्ये गुंतून राहतो. रूपाच्या दृष्टीने आपण त्याला "गुंतून राहणे" असे म्हणू कारण तशीच जाणीव झाली असते किंव्हा तसा भाव असतो. तो भाव वेगळेपण आणि तात्पुरतेपण ह्याचे स्मरण ठेवतो, म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागतो, प्रपंचात खूप गुंतून राहतो, चक्रात चिकटतो, विषयात दंग राहतो, अट्टाहास धरतो, सुख आणि दुःख भोगतो, वगैरे.
भगवंताच्या दृष्टीने सर्व आकार एकमेकात गुंतून राहणे, हे त्याचे कार्य आहे, त्याची इच्छा आहे, त्याची संकल्पना आहे, त्याची शक्ती आहे. शक्तीचे असणे, ह्याच्यातून हा सर्व _परिणाम दिसून येतो_. त्याला विश्र्वरूप भाव म्हणता येईल.
हे का ते असा प्रश्नच नाही आहे, कारण एका स्वतंत्र निर्माण झालेल्या बिंदूवर लक्ष कायम कसं ठेवता येईल जीवाला? दृश्यावर लक्ष किंव्हा भगवत वस्तूवर लक्ष असा काही निर्णय नाही, बुद्धीच्या दृष्टीने. भगवंतावर लक्ष म्हणजे त्याच्या असण्यावर श्रद्धा वाढवणे आणि तिथे मनाला स्थिर करणे. स्थिर होणे ही क्रिया आहे ज्यावरून हेतूचे सर्व गुण गळून पडतात आणि कुठलीही वृत्ती उठत नाही. म्हणजेच मन सूक्ष्म होते.
हा प्रवास गूढ आहे, आणि पूर्णतः श्रद्धेवर अवलंबून आहे. इथे श्रद्धा म्हणजे प्रयास, सैय्यम आणि कृपा ह्याचे मिलन.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home